मका, सोयाबिन, ज्वारीला फुटले कोंब 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मंदाणे : अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्याच्या पूर्व भागात मोठी हानी झाली असून खरीप पीके हातची गेली आहेत. ज्वारी, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांना शेतातच कोंब फुटले असून कपाशीची संपूर्ण फुलगळ झाली असून हिरव्यागार झाडांना आता बोंडाचा बहरच येणार नसल्याने कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून त्याला तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. 
 
परिसरात चोर दिवसापूर्वी झालेल्या अतिपावसाने ज्वारी, बाजारी आणि मक्याचा चाराही हाती येणार नसल्याची स्थिती आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील म्हसावद, सुलतानपूर, ब्राम्हणपुरी, दामळदा, जावदातह, नवानगर, तितरी, शहाणे, मंदाणे, असलोद, पिंपर्डे, लंगडी, गोटाळी, कर्जोत, डोंगरगांव, उजळोद, लोणखेडा आदी परिसरात सततच्या पावसामुळे शेती मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला हंगाम पुरता सडून जात असल्याने शेतकरी पुर्णत हतबल झाला आहे. शेती मालाच्या नुकसानाची पाहणी शहादा तालुका भाजपा अध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांनी पाहणी करून तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. 

सध्या या परिसरात सोयाबीन, मका, ज्वारी खुडणीची कामे सुरू होती. भागातील सोयाबीन उत्पादकांनी पिकांची निगा घेतल्याने पीक बहरले होते. अंदाजे १० ते १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली. काहींनी यंत्राच्या साहाय्याने मळणी केली. असे असूनही अनेकांच्या शेतात कापलेले सोयाबीन पसरून पडून होते. काही सोयाबीन उभे पिकांनी माना टाकल्या आहेत. ज्वारीसह मका पीक काळपट पडून कोंब फुटत आहे. त्यामुळे परतीचा पावसाने शेतकऱ्याचा तोंडचे पाणी पळाले आहे. 

आमदार पाडवींनी दिले आदेश 
तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत आमदार राजेश पाडवी यांनी तहसीलदारांशी संपर्क साधत नुकसानीची तातडीने पाहणी करीत पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. किशोर पाटील व इतर कार्यकर्त्यांनी तहसीलदार व कृषी विभागाशी सपर्क साधत तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. डॉ. पाटील यांनी स्वतः नुकसानग्रस्त बागात जात तेथील पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corn soyabin rain