esakal | येथे भय कोरोनाचे नव्हे, तर भय माणसांचेच...काय घडतेय असे
sakal

बोलून बातमी शोधा

corona chain

गर्दी कमी होत नाही, फिजिकल डिस्टन्सिंग पाळली जात नाही, अनेकांचा तोंडाला मास्क नाहीत. त्यामुळे येथे कोरोनाचा भय नाही, एवढा भय या माणसांचाच वाटू लागला आहे. कारण यांचा निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. 

येथे भय कोरोनाचे नव्हे, तर भय माणसांचेच...काय घडतेय असे

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा साडेचारशेपर्यंत पोहोचला आहे. दिवसागणिक वाढणारा आकडा चिंतादायक आहे. प्रशासनाने चार महिन्यात अनेकदा उपाययोजना म्हणून लॉकडाउन, संचारबंदी, सीमा बंदी, गाव बंदी केली. मात्र कोरोनाचा संसर्ग काही कमी होईना, कारण शासन-प्रशासन उपाययोजना राबवीत असले तरी, त्यांची प्रभावी अंमलबजावणीच होताना दिसत नाही. त्यामुळे जे नको व्‍हायला पाहिजे ते होत आहे. गर्दी कमी होत नाही, फिजिकल डिस्टन्सिंग पाळली जात नाही, अनेकांचा तोंडाला मास्क नाहीत. त्यामुळे येथे कोरोनाचा भय नाही, एवढा भय या माणसांचाच वाटू लागला आहे. कारण यांचा निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. 

कोरोनाची महामारी सुरू झाली, अन् मार्चपासून सर्वांची धावपळ सुरू झाली. या महामारीने साऱ्यांचीच झोप उडविली. लॉकडाउन झाले. त्यामुळे जिल्ह्यातून परराज्यात स्थलांतरित झालेले सुमारे ३७ हजार कामगार जिल्ह्यात परतले. आता परराज्यातून येणाऱ्यांची संख्या नाहीच. तर मग कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात आला कुठून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारूड यांनी अत्यंत दक्षतेने जिल्ह्यात साधारण दीड महिना कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची काळजी घेतली. प्रारंभी त्यांना नागरिकांनीही साथ दिली. 

साखळी निर्माण झालीच कशी?
परराज्यातून ३७ हजार कामगार जिल्ह्यात आले. त्यावेळी त्यांचासोबत कोरोना आला नाही. त्या कामगारांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. सध्या प्रशासनही सांगते. ही संपर्क साखळी आहे. संपर्कामुळे कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. प्रशासन वेळोवेळी लॉकडाउन, संचारबंदी करूनही जर संसर्ग साखळी तोडण्यात अपयश येत असेल, तर हे का केले जाते. उलट याच्यातून सर्वसामान्य मजूर, कामगार, व्यापारी, व्यावसायिक यांचे मोठे नुकसानच आहे. अजून किती दिवस ही मंडळी तग धरेल. हातात पैसा, नाही अन्न धान्य नाही तर संसाराचा गाडा चालणार कसा. याचा विचार केला गेला पाहिजे. संपर्क साखळी तोडण्यासाठी जर संचारबंदी हाच उपाय असेल, तर एकदाचीच कडक संचारबंदी करावी, साधे कॉलनीतही कोणी फिरताना दिसले, तर कडक कारवाई करावी. मात्र तसे होत नाही. त्यामुळे नागरिकही आता मुजोर झाले आहेत. 

म्‍हणूनच भय माणसांचे
नागरिकांना कोरोनाचा आता भय वाटत असला, तरीही बाजारातील गर्दी कमी होत नाही. तोंडाला अनेकांचे मास्क नाही, फिजिकल डिस्टन्सिंग राखले जात नाही. त्यामुळे माणूसच हा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता येथे भय कोरोनाचे नव्हे, तर माणसांचेच जास्त आहे. असेच म्हणावे लागेल. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image