रुग्णसंख्या कमी होताच ८२ कंत्राटी सेविका कार्यमुक्त

रुग्णसंख्या कमी होताच ८२ कंत्राटी सेविका कार्यमुक्त
nandurbar civl health worker
nandurbar civl health workersakal

नंदुरबार : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढल्याने कोविड- १९ आरोग्य विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात नंदुरबार जिल्हा रुग्णालयासाठी (Nandurbar civil hospital) आरोग्यसेविकांची भरती झाली होती. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या ८२ आरोग्य सेविकांना (Nandurbar health worker dismissed) कोरोना संसर्ग कमी होताच कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे या सेविकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. त्यावर पर्याय म्हणून रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी या आरोयसेविकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (nandurbar-coronavirus-ratio-down-and-health-worker-dismissed)

कोरोना महामारीत आरोग्य विभागत वेळोवेळी भरती प्रक्रियेची जाहिरात देऊनही कोणी उमेदवार मुलाखतीसाठी येत नव्हते, अशी स्थिती वर्षभरापूर्वी होती. डॉक्टर तर लांबच होते. दोनदा जाहिरात काढली होती. त्यात काही उमेदवार आले, नियुक्ती झाली, त्यात काही कर्मचारी सेवेत रुजू झाले, तर काही रुजू होण्यासही आले नाहीत, हे वास्तव होते. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत होती. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडखे यांनी गंभीर स्थितीत परिस्थिती हाताळली. कोरोना संकटाला सामोरे गेले. अशा स्थितीत जिल्ह्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी सेवा देत असलेल्या परिचारिका कंत्राटी सेवेची जाहिरात निघताच जिल्ह्यात आल्या. त्या कोरोनाचे संकट असताना जिवाची पर्वा न करता सेवेत रुजू झाल्या. त्यांनी गरज असताना सेवा दिली.

nandurbar civl health worker
भाजपच्या धुळे विकासाची स्वप्ने अडकली ‘खड्ड्या’त

पूर्वसूचना न देताच कार्यमुक्‍त

कोरोनाची दुसरी लाट ओसरली, तिसरी लाट येणे बाकी आहे. त्यासाठी शासन-प्रशासनाची पूर्वतयारी सुरू आहे. मात्र असे असताना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या ८२ आरोग्यसेविकांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना ९ जूनला पत्र दिले. त्यानंतर कार्यालयीन वेळ संपताच या सर्व ८२ कंत्राटी सेविकांना कार्यमुक्त केले. कंत्राट नियुक्ती आदेशात तीन महिने मुदत किंवा साथ रोग आटोक्यात येईपर्यंत दोघांपैकी जे अगोदर घडेल, त्या अटीचा समावेश आहे. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता या सेविकांना कार्यमुक्त केले आहे.

आरोग्य विभागात ४० टक्‍के पदे रिक्‍त

दरम्यान, या सेविकांनी शनिवारी (ता. १२) जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन दिले. जिल्ह्यात यापूर्वी आरोग्य विभागात ४० टक्के पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागात जिथे जिथे आरोग्यसेविका कमी आहेत, तिथे आम्हाला सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com