नंदुरबार जिल्ह्यात २३० कोटींची कापूस खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस खरेदीला वेग देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनीदेखील याबाबत निर्देश दिले होते.

नंदुरबार : कापूस महामंडळाद्वारे किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात १६ हजार शेतकऱ्यांकडून चार लाख २४ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या कापसाची किंमत २२९ कोटी तीन लाख ४३ हजार एवढी आहे. 
कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस खरेदीला वेग देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनीदेखील याबाबत निर्देश दिले होते. लॉकडाउनपूर्वी केवळ दोन लाख ९७ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. लॉकडाउननंतर तांत्रिक अडचणींमुळे व आवश्यक कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने खरेदी प्रक्रिया काही काळ थांबली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी तांत्रिक अडचणी दूर करून खरेदी प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी कापूस खरेदी केंद्रालाही भेटी दिल्या. लॉकडाउन कालावधीत खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांकडील एक लाख २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्याची एकूण किंमत ६७ कोटी ५४ लाख रुपये असल्याचे जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील कापूस खरेदी 
तालुका------------शेतकरीसंख्या----- कापूस (क्विंटल) 
नंदुरबार------------७ हजार ४४-------१ लाख ७० हजार १८९ 
नवापूर----------------७०१----------२४ हजार ४४२ 
शहादा-------------८ हजार २६०-----२ लाख ३० हजार 

एकूण------------ १६ हजार ५---- ४ लाख २४ हजार ९०७ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar cotton kharedi 230 corrore district