पाच वर्षे आघाडी सरकार टिकेल हे दिव्‍यस्‍वप्‍नच : विजय चौधरी

पाच वर्षे आघाडी सरकार टिकेल हे दिव्‍यस्‍वप्‍नच : विजय चौधरी
nandurbar bjp
nandurbar bjp

तळोदा (नंदुरबार) : सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू आहेत. एकमेकांचे पाय ओढण्यात संघर्ष सुरू आहे. श्रेय घेण्यावरून त्यांच्यातच वाद सुरू आहेत, अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार (Maha vikas aghadi government) केव्हाही विसर्जित होऊ शकते. पाच वर्ष सत्ता टिकेल हे दिव्‍यस्वप्नच असल्याची टीका (Nandurbar bjp distict president vijay choudhary) जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली. (nandurbar-district-bjp-meet-and-target-mahavikas-aaghadi-goverment)

भारतीय जनता (Nandurbar bjp) पक्षातर्फे २१ जून ते ६ जुलैपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तळोदा येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी चौधरी बोलत होते. व्यासपीठावर (Mla Rajesh padvi) आमदार राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष, भाग्यश्री चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पांड्या, शानूबाई पाडवी, जिल्हा सचिव हेमलाल मगरे, तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, अनुसूचित मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्निल बैसाने, जिल्हा सहसचिव सपना पाडवी आदी उपस्थित होते.

nandurbar bjp
पाचोऱ्यात ज्‍युनियर बाबा गँग; बंदोबस्ताची मागणी

जिल्हाध्यक्ष श्री. चौधरी म्हणाले, की पक्षाचे प्रेरणास्त्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृती दिवसानिमित्त जिल्ह्यात २३ जून ते ६ जुलै पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. प्रत्येक बूथस्तरावर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संकटाच्‍या वेळी भाजप पुढे : आमदार पाडवी

आमदार पाडवी म्हणाले, ज्या-ज्या वेळी संकटे आली. त्या-त्या वेळी मदतीसाठी भाजप कार्यकर्ते पुढे आली आहेत. कोरोना महामारीच्या संकटात पहिल्या व दुसऱ्या संचारबंदीत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष श्री. चौधरी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com