esakal | सुयर्दशन नाही; दिवसभर पावसाची रिपरिप, मिरचीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar bajar samiti red chilly

गुरूवारी (ता. १०) दिवसभर ढगाळ व गारठामय वातावरण होते. आज दुसऱ्या दिवशीही सूर्य दर्शन झाले नाही. सकाळपासूनच ढगाळ व गारठामय वातावरणात पावसाची भर पडली.

सुयर्दशन नाही; दिवसभर पावसाची रिपरिप, मिरचीचे नुकसान

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी सूर्य दर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तापमानाचा पारा २१ अंशावर आला होता. वातावरणात दिवसभर गारठा होता. दरम्यान, पावसाच्या रिपरिपीमुळे मिरची व्यापाऱ्यांची पथारीवर असलेली मिरची ओली झाली, तर काहींनी गोणपाट झाकून वाचविण्याचा प्रयत्न केला. ढगाळ व पावसाळी वातावरण लक्षात घेता बाजार समितीने १४ डिसेंबरपर्यंत व्यवहार बंद ठेवले आहेत. 

गुरूवारी (ता. १०) दिवसभर ढगाळ व गारठामय वातावरण होते. आज दुसऱ्या दिवशीही सूर्य दर्शन झाले नाही. सकाळपासूनच ढगाळ व गारठामय वातावरणात पावसाची भर पडली. जिल्हाभर काही भाग अपवाद वगळता रिपरिप सुरू होती. त्यामुळे हिवाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव जिल्हावाशियांनी अनुभवला. यामुळे कापूस, मिरची, पपईचे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. 

पावसाने पुन्हा नुकसान
पावसाची रिपरिप दोन-तीन दिवस सुरूच असली, तर कापूस पिवळा व काळा पडून शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. तर लाल पिकलेली मिरची तसेच पपई झाडावरून खाली गळून नुकसान होईल. तसेच फुल बहारही नष्ट होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे. आज वातावरणात गारठा होता. तापमानाचा पारा २१ अंशावर आला आहे. दिवसभर नागरिक उबदार कपडे अंगात घालून फिरताना दिसून आले. 

१४ डिसेंबरपर्यंत व्यवहार बंद 
दरम्यान, वातावरणाची स्थिती लक्षात घेता बाजार समितीने आता १४ डिसेंबर पर्यंत खरेदी विक्रीचा व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. से राजीव सुत गिरणीतही कापूस खरेदी बंद ठेवली आहे. त्यामुळे शेतक्यांनी आपला शेतीमाल आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top