esakal | सावधान : नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता 

बोलून बातमी शोधा

RAIN

वीजा आणि गारपीटीपासुन स्वतःसह गुरा - ढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी

सावधान : नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता 
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः नंदुरबार जिल्हयात उद्यापासून दोन दिवस वादळीवारा ( ताशी ४० ते ५० किमी / तास ) , वीज व गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी .असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

आवश्य वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
 


याबाबत हवामान विभागाच्या वेध शाळेने आजचा अहवालात म्हटले आहे की, नंदुरबार जिलह्यात मंगळवार व बुधवार असे दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल व काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकुन ठेवावीत ., वादळी वारे पासुन संरक्षणासाठी भाजीपाला , मिरची , पपई , केळी , ईत्यादी पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी ., पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत ., पथारीवर वाळत ठेवलेली मिरची सुरक्षित ठिकाणी झाकुन ठेवावी.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल , तर त्या मालाचे नुकसान होणार नाही, अशी काळजी घ्यावी , विजेपासून व गारांपासून बचावा साठी सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा ., मोकळे मैदान , झाडाखाली , वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये . नागरीकांनी वादळी वारे , वीजा आणि गारपीटीपासुन स्वतःसह गुरा - ढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालया कडून करण्यात आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे