नंदुरबार जिल्‍हा परिषदेच्‍या ११ जणांचे सदस्यत्व रद्द 

नंदुरबार जिल्‍हा परिषदेच्‍या ११ जणांचे सदस्यत्व रद्द 

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या ११ जिल्हा परिषद सदस्य आणि १४ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवार पासून रद्द केले आहे. 


जिल्हा परिषद सदस्यांची व कंसात गटाचे नाव असे : भूषण रमेश कामे (खापर), कपिलदेव भरत चौधरी (अक्कलकुवा), अभिजित मोतीलाल पाटील (म्हसावद), जयश्री दीपक पाटील (लोणखेडा), धनराज काशीनाथ पाटील (पाडळदे बुद्रुक), शालिनीबाई भटू सनेर (कहाटूळ), योगिनी अमोल भारती (कोळदे), शोभा शांताराम पाटील (खोंडामळी), ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी (कोपर्ली), शकुंतला सुरेश शिंत्रे (रनाळा), रुचिका प्रवीण पाटील (मांडळ). 

पंचायत समिती सदस्यांची व कंसात गणाची नावे अशी : विजयता दिलीप बोरसे (कोराई ), वैशाली किशोर पाटील (सुलतानपूर), विद्या विजय चौधरी (खेडदिगर), सुषमा शरद साळुंखे (मंदाणे), श्रीराम धनराज याईस (डोंगरगाव), कल्पना श्रीराम पाटील (मोहिदे तह), रवींद्र रमाकांत पाटील (जावदे तबो), योगेश मोहन पाटील (पाडळदे ब्रु), शिवाजी मोतीराम पाटील (शेल्टी), धर्मेंद्रसिंग देवीसिंग परदेशी (गुजरभवाली), लताबेन केशव पाटील (पातोंडा), दीपक भागवत मराठे (होळतर्फे हवेली), अनिता अशोक राठोड (नांदर्खे), सीमा युवराज माळी (गुजरजांभोली). 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com