esakal | नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच पडणार खिंडार : अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार ! 
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच पडणार खिंडार : अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार ! 

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपला खिंडार पाडणारा ठरणार आहे. जिल्ह्यात एक क्रमांकावर असलेल्या भाजपला अंतर्गत गटातटाचे राजकारण भोवणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच पडणार खिंडार : अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार ! 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश केला अन खानदेशात भाजप पक्षाला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह नंदुरबार जिल्ह्यातील दोन माजी आमदारासह वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी आधीच राष्ट्रवादीत दाखल झाले असून भाजप मधील अजून नाराज गट आता खडसे सोबत राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहे.  

आवश्य वाचा- खडसेंच्या प्रवेशाने उत्‍तर महाराष्‍ट्रात नवीन परिणाम : अरूणभाई गुजराथी
 

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्हा आघाडी शासनातील मंत्रिपद राष्ट्रवादीच्या कोट्यातून नंदुरबार जिल्ह्याला सतत मिळत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली होती. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. कारण सत्ता जेथे कार्यकर्ते तेथे हे राजकारणातील समीकरण बनले आहे. मात्र मागील पाच वर्ष भाजप-शिवसेनेची सत्ता राज्यात आली. नंदुरबार जिल्ह्याच्‍या वाट्याला मंत्रिपद मिळाले नाही, मात्र मोदी लाट व आता भाजपच कायम सत्तेत राहील. अशा वातावरणामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी रात्रंदिवस मेहनत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांची साथ मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर आहे, असे म्हटलेले वावगे ठरणार नाही. 

भाजपचा नाराज गट राष्ट्रवादीत जाणार

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपला खिंडार पाडणारा ठरणार आहे. जिल्ह्यात एक क्रमांकावर असलेल्या भाजपला अंतर्गत गटातटाचे राजकारण भोवणार आहे. आज जरी तळोदा -शहादा मतदार संघातील माजी आमदार उदेसिंग पाडवी व अक्ककुव्याचे माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी यांनी भाजप सोडले असून आगामी काळात ग्रामीण भागातील तळागाळातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. 

यांनी घेतला आहे प्रवेश 
अक्कलकुवा-धडगाव विधानसभेचे माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी, तळोद्याचे डॉ. रामराव आघाडे, शहाद्याचे वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. तुषार संनसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना तिकीट नाकारल्यामुळे वर्षभरापूर्वीच भाजप सोडली होती. त्यांनी वीस दिवसापूर्वी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेही नाथाभाऊंच्या सांगण्यावरूनच त्यांनी प्रवेश घेतला होता. 

संपादन- भूषण श्रीखंडे