शेतात मशागतीचे सुरू होते काम तेवढ्यातच मधमाश्यांनी केल्ला हल्ला, आणि शेतकरी झाले सैरावैरा !

योगीराज ईशी 
Monday, 26 October 2020

शेतकरी सैरावैरा धावू लागले. मात्र मधमाशा अधिक खवळल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी जवळच असलेल्या पाण्याचा कुंड, डबक्याचा आधार घेत माशांचा हल्ला चुकवित गावाकडे पळ काढला. 

कळंबू  : शेतात मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनवर मधमाशांनी हल्ला केल्याने कळंबू ता. शहादा येथील शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली. जवळच असलेल्या पाण्याचे डबके, कुंडाचा आधार घेत शेतकऱयांनी कसामसा आपला जीव वाचवीला.  

आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली ! 

रब्बीच्या तयारी साठी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतात रोटा मारण्याचे काम चालू असतांना बांधावरच्या झाडावर मधमाशांचे पोळ बसले आहे. याचा अंदाज ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात न आल्याने मधमाशाच्या टोळक्या जवळून ट्रॅक्टर गेले. व ट्रॅक्टरच्या धुरामुळे मधमाशा खवळवल्याने ट्रॅक्टर चालक अमोल भिका पाटील, नरेंद्र गणपत शिंदे, लोटन झेंडू बोरसे, सुकलाल देवराम सोलंकी, व देवा गिरासे यांच्यावर माशांनी हल्ला केल्याने शेतकरी सैरावैरा धावू लागले. मात्र मधमाशा अधिक खवळल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी जवळच असलेल्या पाण्याचा कुंड, डबक्याचा आधार घेत माशांचा हल्ला चुकवित गावाकडे पळ काढला. सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला. यामुळे शेतकरी व शेत मजुरा मध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.

संकट वेळी लढवली शक्कल
मधमाशांनी हल्ला करताच शेतकरी भयभीत होवून सैरावारा पळत होते. परंतू संकट काळात शक्कल लढवत जवळच असलेल्या डबक्याचा व चिखलाचा आश्रय घेऊन त्यांनी माशांच्या टोळक्या पासून सुटका मिळवण्यात यश मिळवीले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Farmers were attacked and injured by bees