गणेश विसर्जन करताना सहा युवक बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नंदुरबार ः तलावात गणेश विसर्जन करताना कमरावद (ता. शहादा) येथील सहा युवकांचा आज बुडून मृत्यू झाला. वडछिल शिवारातील तलावात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे गावावार शोककळा पसरली आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. 

जिल्ह्यात आज पाचव्या दिवसाचे गणेशविसर्जन करण्यात आले. कमरावद गावावजवळील तलावावर विसर्जनासाठी गावातील युवक गेले होते. या तलावाला यंदा प्रथमच जास्त पाणी असल्याने मूर्ती मध्यापर्यंत नेण्याच्या प्रयत्नात असलेले दोघे जण खोल पाणी आणि गाळाचा अंदाज न आल्याने बुडाले, ते बुडत असल्याने इतर चौघे त्यांच्या मदतीला धावले, मात्र खोली जास्त असल्याने तेही बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यातील एकाच तरूणाला पोहता येत होते. काठावरील इतरांनी आरडाओरड केल्याने एकच हल्लकल्लोळ उडाला. परिसरातील ग्रामस्थ तलावाच्या काठी जमले, त्यातील पोहणाऱयांनी उड्या घेत त्यांच्या शोध घेणे सुरू केले आहे. .

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar ganesh visarjan 6 youth