दिड तोळे सोने असलेली बॅग दुचाकीवरून पडली ! आणि नशिबाने प्रामाणिक मजूराला सापडली 

दिड तोळे सोने असलेली बॅग दुचाकीवरून पडली ! आणि नशिबाने प्रामाणिक मजूराला सापडली 

वैंदाने : सध्या सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाका बाहेर गेले आहेत .एक ग्रॅम सोन घ्यायचे म्हटले तरी बरिच जमवाजमव करावी लागते.अशातच हातावर पोट असलेल्या मजुराला जर दिळ तोळे सोने असलेली , मौल्यवान कपडे, रोख रक्कम असलेली बॅग सापडली आणि त्याने जर ती मूळ मालकाला परत केली तर. 

नंदुरबार तालुक्यातील वैंदाने येथील रहिवासी व बांधकाम व्यावसाय करून कुटुंबाचा उधार निर्वाह करणाऱ्या मल्हार गौंधल पिंपळे यांनी शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथील दाम्पत्याची सोन्याचे दागिने असलेली बॅग परत केल्याचे प्रकार नुकताच घडला असून मजुराने दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. 

आणि रस्त्यावर बॅग बेवारस सापडली
मालपूर येथील रहिवाशी निलेश भामरे,बहीण रुपाली भामरे व शीतल भामरे हे मालपूर येथून दुचाकीने शनिमांडळ येथे लग्नासाठी जात होते.गाडीला मागे बॅग बांधली होती त्यात १४ ग्रॅम वजनाचे विविध अलंकार होते तसेच, नवीन घागरा, सात साड्या व रोख स्वरूपात काही रक्कम होती शनिमांडळ येथे पोहोचल्यावर बॅग प्रवासादरम्यान पडल्याचे त्यांचे लक्षात आले सर्वत्र शोधाशोध झाली पण बॅग सापडली नाही ,लगेच सोसिल मीडिया वर ही बॅग परत करण्यासंदर्भात ची पोस्ट शेअर करण्यात आली दरम्यान मल्हार गौंधलं पिंपळे हे मालपूर येथील काम आटोपून वैंदाने येत असताना रस्त्यावर ही बॅग बेवारस स्थितीत दिसली .बॅग सोबत आणून वैंदाने ग्रामस्थांना बॅग सापडल्याचे संगीलते .तो पर्यंत बॅग हरवली आहे ही बातमी काही लोकांना माहीत झाली होती लगेच मूळ मालकाचा पत्ता माहिती झाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैंदाने येथे बोलावून बॅग परत करण्यात आली. 

मल्हार पिंपळे यांचा सत्कार 
मल्हार पिंपळे यांचा ११०० रूपये नारळ व स्नेह वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला . मल्हार पिंपळे यांच्या या प्रामाणिक पणा बद्दल कौतुक करण्यात येत आहे. 

मेहनतीने कमवलेले ही माणसाला पुरत नाही हे तर सापडलेले होते हे किती दिवस पुरणार . माझा मेहनतीवर विश्वास आहे. 
- मल्हार गौंधल पिंपळे 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com