सलसाडी येथे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नंदुरबार ः जिल्ह्यातील सलसाडी येथील शासकिय आश्रम शाळेत शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्याला आज सकाळी शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त पालकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी गौडा आणि तहसिलदार चंद्रे यांच्यावर हल्ला चढविला. यात दोघे जखमी झाले आहेत. 

सलसाडी येथील शासकिय आश्रम शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. सचिन चांद्रसिंग मोरे असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. सदर घटना आज सकाळी अकरा- साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. शॉक लागल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनमुळे पालक व गावातील नागरीक संतप्त झाले होते. संतप्त पालकांनी थेट सहाय्यक जिल्हाधिकारी विजय गौडा आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यावर हल्ला चढविला. यात सहाय्यक जिल्हाधिकारी गौडा यांना गंभीम जखमा झाल्या असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news nandurbar goverment aashram school student daith