ज्‍वारीचे बोगस बियाणे..कृषी केंद्रचालकाची ४५ लाखांची फसवणूक 

fraud
fraud

नंदुरबार : बोगस ज्वारीचे बियाणे देत कृषी केंद्रचालकाची ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील दोघांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
नाशिक येथील योगेश रवींद्र कोठावदे (रा. रवींद्र विद्यालयाजवळ, द्वारका, नाशिक) व साधना निंबा कोठावदे या दोघांनी २०१७ मध्ये टुथफूल (सत्यदर्शक प्लॉट क्रमांक एएस ७६०) या ज्वारीचे सदोष बियाणे तीन किलो पॅकिंगमध्ये अशी दहा हजार २०० इतकी पाकिटे नंदुरबार येथील कृषी केंद्रचालक सुरेश रोहिदास पाटील यांना दिली होती. सुरेश पाटील यांनी या बियाण्यांची दोघांकडून खरेदी करून नंदुरबारला सुमारे ५० शेतकऱ्यांना विक्री केली. परंतु हे ज्वारीचे पीक १२ ते १४ फूट इतके वाढूनही त्याला कणीस आले नाही. यामुळे नुकसानापोटी प्रतिपाकीट एक हजार रुपये याप्रमाणे दहा हजार ३० पाकिटांची एकूण ४२ लाख २२ हजार ५०० रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना आरटीजीएस व चेकद्वारे दिली व सुरेश पाटील यांचे कंपनीकडे बाकी असलेले दोन लाख ४५ हजार ६४५ असे एकूण ४४ लाख ७१ हजार १४५ रुपये योगेश कोठावदे व साधना कोठावदे यांच्याकडे येणे बाकी होते. यासाठी दोघांनी सुरेश पाटील यांना नोटरी करून देऊनदेखील ही रक्कम दिली नाही. तसेच ४४ लाख ७१ हजार १४५ रुपयांचा धनादेश सुरेश पाटील यांना दिला. सुरेश पाटील यांनी धनादेश बॅँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वठविण्यास दिला असता तो वठला नाही. यामुळे सुरेश पाटील यांनी संशयित अभिजित सीड्स कंपनीचे परवाना व स्टेटमेंट फर्स्ट व सेकंडची मागणी केली असता कंपनीने त्यांना खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक केली. याबाबत पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संशयित योगेश व साधना कोठावदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com