esakal | वीज जोडणी नसतांना शेतकऱ्यास ६९ हजाराचे बील 
sakal

बोलून बातमी शोधा

light bill mahavitaran

मागणी करून वीज जोडणी केलेली नाही, उलट वीज कनेक्शन नसतांना बील आकारणी केल्याने वीज महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार पुन्हा अकदा चव्हाट्यावर आला आहे. 

वीज जोडणी नसतांना शेतकऱ्यास ६९ हजाराचे बील 

sakal_logo
By
दिलीप गावित

विसरवाडी (नंदुरबार) : दापूर (ता. नवापूर) येथील शेतकऱ्याने आठ वषार्पासून शेतीसाठी वीज जोडणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी डिमांड नोटची रक्कमही भरली आहे. मात्र अद्याप वीज जोडणीच करण्यात आलेली नाही. तरीही त्यांचा नावे चक्क ६९ हजार रूपयाचे बील आकारणी करून तसे देयक पाठविले आहे. त्यामुळे संबधित शेतकऱ्यास धक्काच बसला आहे. मागणी करून वीज जोडणी केलेली नाही, उलट वीज कनेक्शन नसतांना बील आकारणी केल्याने वीज महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार पुन्हा अकदा चव्हाट्यावर आला आहे. 
दापूर (ता.नवापूर) येथील रेक्या नेंडाडा गावित या शेतकऱ्याने त्यांचे गट क्रमांक १३/३ क यांचे मालकीचे शेत जमीन असून तेथील विहिरीवर सिंचनासाठी तीन एचपीची इलेक्ट्रिक मोटर पंप बसवण्यासाठी १५ मार्च २०१२ ला वीजपंप जोडण्यासाठी ५ हजार ७०० रूपये डिमांड रक्कम विज वितरण कंपनीकडे भरले. त्याची पावती देखील आहे. परंतु महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मार्फत आठ वर्ष उलटूनही अद्याप शेतकऱ्याला विद्युत जोडणी करून मिळालेले नाही. उलट संबंधित शेतकऱ्याला तिमाही कृषी पंप वीज वापराच्या देयक वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ४ हजार १८५ युनिट वीज बिलाचे वीज वापर म्हणून ६८ हजार ८९० रुपये बिलाची आकारणी करण्यात आले आहे.

बिलाबाबत दिला अर्ज
संबंधित शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन नाही अथवा कोठूनही अवैधरीत्या विज वापर केलेले नसताना एवढ्या रकमेचे बिल आकारणी करून बील अदा केले गेले कसे? असा प्रश्न पडला आहे. या प्रकारामुळे शेतकरी गावित चांगलेच हादरले आहे. ज्या वीजेचे कनेक्शन नाही, वीजेचा वापर नाही तर बील दिले कसे, या प्रकाराबाबत गावित यांनी भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के. टी. गावित यांची भेट घेऊन माहिती दिली. उपअभियंता नवापूर यांना अर्ज देण्यात आला आहे. मात्र विज वितरण कंपनीचा या अनागोंदी कारभाराचे हे वास्तव उदाहारण आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे