नरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे जाहीर सभा होणार आहे. येथील दोंडाईचा रस्त्यावरील श्री. स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या जागेवर सकाळी साडेअकराला ही सभा होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार रावल व पक्षाचे संघटनमंत्री किशोर काळस्कर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

उमेदवार डॉ. हीना गावित, पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी तसेच रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते. श्री. रावल म्हणाले, की धुळे आणि नंदुरबार मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मंत्री रामदास आठवले तसेच धुळ्याचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित राहतील. या सभेसाठी लगतच्या मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्य आणि जळगाव जिल्ह्यातूनही लोक येणार असल्याने ही विराट सभा असेल, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: marathi news nandurbar modi 22 april sabha