नर्मदा नदीत बोट उलटून 66 जण बुडाल्याचा अंदाज 

live photo
live photo

नंदुरबार ः धडगाव तालुक्‍याजवळ नर्मदा नदीच्या बॅक वॉटर असलेल्या भुसा पॉईंटजवळ बोट उलटून 66 जण बुळाल्याची भिती व्यक्‍त होत आहे. यातील सहा जणांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले असून, आणखी काही जणांच्या शोधासाठी मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने नेमकी आकडेवारी हाती आली नसली, तरी दुर्घटनेला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. 
नर्मदेच्या बॅकवॉटर धडगाव तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पसरले आहे. या बॅक वॉटरच्या पलिकडच्या काठावर असलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी येण्या- जाण्यासाठी बोटीचा वापर करतात. अशीच बोट दुपारी साडेबाराला भुसा पॉईंटवरून निघाली. मात्र बोटीमध्ये प्रमाणपेक्षा जास्त लोक बसले असल्याने ती उलटल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात असून यातील 66 जण बुडाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. यातील सहा जणांना धडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, धडगावचे नायब तहसिलदार राजेंद्र दराडे पोहचत आहेत. त्यानंतर घटनेविषयीची अधिक माहिती मिळू शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com