esakal | मध्यप्रदेश- महाराष्ट्र राज्य सीमा वाऱ्यावर; व्यावसायिकांचा सर्रास वावर

बोलून बातमी शोधा

madya pradesh maharashtra border
मध्यप्रदेश- महाराष्ट्र राज्य सीमा वाऱ्यावर; व्यावसायिकांचा सर्रास वावर
sakal_logo
By
टिम इ सकाळ

ब्राम्हणपुरी (नंदुरबार) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ही खेडदिगर (ता. शहादा) येथे नागरिकांची तुफान गर्दी मध्यप्रदेशातील खेतीय पूर्णतः लोकडाउन असल्याने महाराष्ट्र मधील नियमाची सर्रास पायमल्ली सुरू आहे.

मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर असलेल्या खेडदिगर या राज्य सीमेवर दिवसभर शेकडोंच्या संख्येने गर्दी बिनधास्त दिसून येते शासनाने अत्यावश्यक वस्तूसाठी वेळ दिला असला तरी त्या सोबत इतर व्यावसायिक ही जोमात आपले दुकान उघडून नियमाची पायमल्ली करताना दिसून येत आहे. लॉकडाउन असतानाही सर्व व्यावसायिक आपले दुकान बिनदिक्कत उघडेकरून जोमात व्यवसाय करताना दिसून येत आहेत

गुजरातचा आदर्श घ्यावा

गुजरात राज्याचा आदर्श घेण्याची वेळ आली आहे. त्याठिकाणी राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली असून कोरोना संसर्ग होण्यास आळा घातला जात आहे. त्या उलट या सीमेवर मात्र आवो जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. मध्यप्रदेश शासनाने बडवाणी जिल्हा पूर्णतः लोकडाऊन केल्याने खेतीय येथील काही व्यापारी सरळ महाराष्ट्राच्या हद्दीत घुसून बिनदिक्कत आपला व्यवसाय चालवत आहेत. कोणाची तपासणी नाही कोणाची विचारपूस नाही. अंतर राज्य सीमा ही जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्या स्थितीत दिसून येत आहे

अशी आहे स्‍थिती

- पोलिस प्रशासन बुजगावण्याच्या भूमिकेत, विना मास्क वावणारे व काही अवैध धंदे बिनधास्त

- स्थानिक स्वराज्य संस्थेने कडक नियमाची अंमलबजावणी करण्याची गरज

- अत्यावश्यक वस्तू सहित सर्वच व्यवसाय जोमात सुरू जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे