
खाली पोकळ पणा अधिक जाणवू लागल्याने 30 जानेवारी रोजी स्टाईल दुरुस्ती करण्यासाठी काढून पाहिली असता...
कळंबू : चौदा बाय बारा साईज असलेल्या बैठक रूममध्ये अचानक सहा फुटी खोल खड्डा वजा भुयार पडल्याने आचर्य व्यक करण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील कळंबू येथील मोहन मंगा महाजन यांच्या माळी वाडयातील राहत्या घरात बैठक खोलीतील तळ भाग अचानक खचल्याने बघ्यांनी खड्डा बघण्यासाठी एकच गर्दी केली.
आवश्य वाचा- सरपंच, उपसरंपच पदासाठी पाहिले स्वप्न; पण झाला अजब प्रकार आणि झाले 'घर के ना घाटके'
या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याचा घरमालकाला धक्काच बसला कारण या पोकळ भागावरून सर्व व्यवहार सुरू होते.जर लक्ष गेले नसते तर पूर्ण घराला इजा होऊन संकटाला सामोरे जावे लागले असते. स्टाईल खाली पोकळ असल्याचा अंदाज त्यांना काही दिवसांपूर्वी होता. मात्रा स्टाइल खालचाच भाग खचला असेल या भरोशावर सर्व सुरळीत होते. मात्र खाली पोकळ पणा अधिक जाणवू लागल्याने ता. 30 जानेवारी रोजी स्टाईल दुरुस्ती करण्यासाठी काढून पाहिली असता भुयार रुपी खोल खड्डा नजरेस पडल्याने घरमालक च्रकावले. बारा बाय चौदाच्या रूममध्ये अंदाजे आठ बाय सात ते आठ साईज चा तब्बल सहा फुटी खड्डा आढळून आला. खड्डा पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
आवश्य वाचा- राज्यभरात आजपासून अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम
२ जानेवारीला भुकंप
2 जानेवारीला दुपारी शहादा तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. याबाबत शहादा तालुक्यातील सावळदा येथील भूकंप मापक केंद्रात 3.2 रिस्टर स्केलची नोंद करण्यात आली होती. याचे धक्के वडाळी, मंदाने, कहाटूळ मंडळातील काही गावात जाणवला होता. कदाचित नकळत याचे धक्के बसून पोकळ भागात भराव खचून येथे इजा झाली असावी असा अंदाज लावला जात आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे