नंदुरबार रेल्वे स्थानकवर तुफान दगडफेक; महिलेची छेड काढल्यावरून तणाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नंदुरबार : सुरत- भुसावळ रेल्वेतील प्रवाशयांनी महिलेची छेड काढल्याप्रकरणी नंदूरबार रेल्वे स्टेशनवर रविवारी (ता.२५ )रात्री अकराच्या सुमारास तुफान दगडफेक करण्यात आली. यामुळे शहरात तणाव पसरला होता.

नंदुरबार : सुरत- भुसावळ रेल्वेतील प्रवाशयांनी महिलेची छेड काढल्याप्रकरणी नंदूरबार रेल्वे स्टेशनवर रविवारी (ता.२५ )रात्री अकराच्या सुमारास तुफान दगडफेक करण्यात आली. यामुळे शहरात तणाव पसरला होता.

पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून स्तिथी आता नियंत्रणात आहे, जमावाने केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि दोन पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसात अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या घटनेतून दगडफेक झाली. घटना घडली आहे. सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर जमलेल्या जमावाने रेल्वेस्टेशन तसेच परिसरात दगडफेक केली. प्लॉटफॉर्मवरुन जाणाऱ्या मालगाडीवर संतप्त जमावाकडून दगडफेड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर  रेल्वेस्टेशनच्या लगत असणाऱ्या बादशाह नगर परिसरात  घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या दगडफेकीत रेल्वे कर्मचाऱ्यासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. छेडखानी झालेल्या त्या महिलेने अद्याप कोणतीही तक्रार दिलेली नाही. या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. लोहमार्ग पोलिस घटनेची सखोल चौकशी करीत आहेत. दरम्यान घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar railway station dagal fek