PHOTO प्यायला नाही, हात धुवायला कुठून येणार?; कोरोनाकाळातील व्यथा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

धडगाव हा नर्मदेच्या काठाला पसरलेला तालुका. वर्षानुवर्षे प्रशासन येथे पाण्यासाठी अक्षरक्षः पाण्यासाऱखा पैसा खर्च करते, तरीही मार्च संपला की वाड्यापाड्यांवर पाण्याची भीषण समस्या आ वासून उभी राहते.

धडगाव : एकिकडे कोरोनाचे संकट उभे असतान सातपुडयातील आदिवासींसमोर पिण्याच्या पाण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाशी सामना करताना नागरिकांसमोर पिण्यासाठी पाणी नाही तर हात धुवायला कुठून आणायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दूरवरून डोगराच्या खाईतील विहिरीतून कसेतरी पाणी शेंदून आणायचे आणि डोंगर चढायचा असा दिनक्रम महिलांच्या वाटेला आला आहे. 

आवर्जून वाचा - अंत्यसंस्कारावेळी बसला आश्‍चर्यचा धक्का...दुसराच निघाला मृतदेह, धुळे रुग्णालयाचा गोंधळी कारभार !

No photo description available.

जिल्ह्यातील धडगाव हा नर्मदेच्या काठाला पसरलेला तालुका. वर्षानुवर्षे प्रशासन येथे पाण्यासाठी अक्षरक्षः पाण्यासाऱखा पैसा खर्च करते, तरीही मार्च संपला की वाड्यापाड्यांवर पाण्याची भीषण समस्या आ वासून उभी राहते. यंदा कोरोनाच्या संकटात ही समस्या थोडी दुर्लक्षितच झाली. शासन हात धुवायला सांगत असले तरी येथे प्याया दोन घोट नाही तर हात धवाचे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

उन्हात रोजची पायपीट 
धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळ या गावाच्या बुरुमपाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्याने पहाडात पायवाटेने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ७ किलोमीटरची रोजची पायपीट महिला करीत आहेत. गुरांसाठी त्यांच्यासह सहा ते सात किलोमीटरची पायपीट वेगळीच. मागील वर्षी गाढवावरून पाणी पोहचवण्याची नामुष्की सरकारवर आली होती. कारण कुयलिडाबरला अजून रस्ता नाही. आत्ता कोरोनाचे सकट असताना महिलांना अशी वणवण करावी लागते. 

पाण्यासाठी गाव स्वयंपुर्ण करण्यासाठी प्रयत्न 
याबाबत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या,‘ आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. गावातील सामूहिक वन व्यवस्थापन समितीनेही पुढच्या उन्हाळ्यात गांव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झालेले पाहिजे असे ठरवले आहे. यासाठी सातपुड्यातील गावांनी, तरुण कार्यकर्त्यांनी व लोक समन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष मोर्च्याच्या माध्यमातून सातपुडा संवर्धन मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे सातपुड्यातील जंगल पुन्हा उभे करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आपणही आपल्या कल्पना तसेच वेगवेगळ्या माध्यमाद्वारे मदतकरू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar satpuda aadivasi pada no water