esakal | सातपुडा परिसर नेसू लागला हिरवा शालू! 
sakal

बोलून बातमी शोधा

satpuda

सध्या पावसाळा सुरू झाल्याने सातपुड्यातील पर्यटन स्थळे व सातपुडा परिसर हिरवा शालूने पांघरला जात आहे. मनाला भावणारे नैसर्गिक दृश डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण या परिसरात भेटी देत आहेत. ही पर्यटनस्थळे महाबळेश्वर, आंबोली या प्रसिद्ध स्थळांची आठवण करून देतात.

सातपुडा परिसर नेसू लागला हिरवा शालू! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळोदा : सातपुड्यातील प्रेक्षणीय स्थळांनी हिरवा शालू नेसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक या परिसरात भेटी देत आहेत. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी लांबून पर्यटक येतात. मात्र सोयीसुविधा नसल्याने ही पर्यटनस्थळे भकास झाली आहेत. त्यामुळे या प्रेक्षणीय स्थळांवर सुविधा वाढ होण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपाययोजना होत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

सध्या पावसाळा सुरू झाल्याने सातपुड्यातील पर्यटन स्थळे व सातपुडा परिसर हिरवा शालूने पांघरला जात आहे. मनाला भावणारे नैसर्गिक दृश डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण या परिसरात भेटी देत आहेत. ही पर्यटनस्थळे महाबळेश्वर, आंबोली या प्रसिद्ध स्थळांची आठवण करून देतात. या पर्यटन स्थळांमध्ये वाल्हेरी धबधबा, चांदसैली घाट, बिलगाव येथील बारामुखी धबधबा, उनपदेव, तोरणमाळ, कुंडलेशवर व सातपुड्यातील विविध स्थळांचा समावेश आहे. 
चांदसैली घाट रस्त्यावरून गढवली, रोझवा, पाडळपूर प्रकल्प पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या प्रकल्पातील चंदेरी दिसणारे पाणी घाट रस्त्यावर पर्यटकांना काही काळ थांबण्यासाठी आकर्षित करते. मात्र सध्या हे प्रकल्प तसे कोरडेच आहेत. 

या पर्यटनस्थळांवर याआधीही अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. तळोद्यातील दोन सख्खे भाऊ बिलगाव येथे व जैन कुटुंबातील तरुण व्यापारी यांच्या वाल्हेरी येथे मृत्यू झाला होता. तोरणमाळ येथील प्रसिद्ध सिताखाई येथेही अनेक घटना घडलेल्या आहेत. मागील वर्षीच नंदुरबार येथील शुभम शिंदे या युवकाच्या वाल्हेरी येथील धबधब्यात बुडून मृत्यू झाला होता. इतरही घटनांमध्ये वाल्हेरी येथे याआधीही चार तरुणांच्या मृत्यू झाल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या पर्यटनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्यानेच अपघाताचा घटना घडतात, त्यासाठी येथे सुविधांत वाढ होणे आवश्यक आहे. 

पर्यटनासाठी गर्दी वाढतेय 
सातपुड्यातील प्रेक्षणीय पर्यटनस्थळांवर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील पर्यटन जपून करणे आवश्यक असते. मात्र विविध पर्यटन स्थळांवर कोणतेही सूचनाफलक अथवा सुरक्षारक्षक नसल्याने हौशी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून दुर्गम परिसरात फिरत असतात. त्यामुळे पर्यटन विभागाने अशा धोकेदायक स्थळांवर सूचना फलक लावण्याची गरज आहे. सध्या कोरोनाच्या तणावातून मुक्तीसाठी अनेकांचे पाय पर्यटन स्थळी वळत असून पर्यटन विभागाने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी आहे. 

पर्यटनस्थळांवर फलक हवेत 
निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी व निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ राहण्यासाठी हौशी पर्यटक या स्थळांना भेटी देत असतात. त्यातून अनेक वेळा जीव धोक्यात घालून फेरफटका मारत असतात. अशावेळी या पर्यटनस्थळांवर सुरक्षेचा कोणत्याही उपाययोजना नसतात. या पर्यटन स्थळांवर तसे कोणतेही सुरक्षेचे सूचना फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे उत्साही तरुण या ठिकाणी येऊन आपला जीव गमवत आहेत. त्यामुळे पर्यटन विभागाने लक्ष देऊन या स्थळांवर फलक लावण्याची मागणी होत आहे.