कुणी न्याय देता का, आम्हाला न्याय? 

senior citizen
senior citizen

नंदुरबार : आयुश्‍यभर कमावलेली पुंजी निःस्वार्थपणे मुलांच्या ताब्यात देणाऱ्या व मुलांकडूनच अवहेलना झालेल्या नटसम्राटमधील अप्पा बेलवलकरांची व्यथा आजही संपलेली नाही. ज्येष्ठांसाठी सरकारने कायदा करून त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नंदुरबारमधील ज्येष्ठांवर कुणी न्याय देता का, आम्हाला न्याय असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे. 

पिडीत ज्येष्ठ आपल्या निर्वाहाचा प्रश्न घेऊन न्यायाधिकरण आणि मा. अपीलीय न्यायाधिकरणाकडे धाव घेत असतात. परंतू कायद्याने घालून दिलेल्या विहित मुदतीत आदेश पारित केले जात नाहीत. आदेश झालाच तर त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा उद्देशही सफल होत नाही. निर्णय दिल्यानंतर मुलाने आदेशाचे पालन केले नसेल तर त्यास दंड करण्याचे, वॉरंट बजावण्याचे, कैदेत पाठविण्याचे अधिकार, महसूल विभागाच्या अधिका-यांना बहाल केले असतांनाही त्याचा वापर केला जात नाही, म्हणून जिल्हयात आई बापाला छळणा-या मुलांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. 

ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याबाबतच्या निकालाची अंमलबजावणी न होण्याला नंदुरबारचे तहसीलदार, प्रांतधिकारी दोघेही जबाबदार आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांकडे आम्ही फक्त आमच्या बाजूने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करून आईवडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांवर कारवाईची मागणी केली होती, लोकशाही मार्गाने आंदोलने केली, तरीही नंदुरबारच्या तहसीलदारांनी आमच्या मागणीची दखल घेतली नाही की आदेशाची अंमलबाजावणी केलेली नाही. जिल्हाधिकारींनी कारवाईबाबत दिलेल्या पत्रांची साधी दखलही घेतली नाही, त्यामुळे आम्ही निराधारांसारखे जीवन जगत आहोत. 

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासन गंभीर नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारींनी त्यांच्या अध्यक्षतेखाली, पोलिस अधीक्षक, सहा. आयुक्त, समाजकल्याण, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे. 

आदेश डावलणाऱ्यावर कारवाई करा 
वरिष्ठांच्या आदेशांची अवज्ञा करणा-या तहसिलदारावर कार्यालयीन कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदनावर आई वडिल व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बारकू नवल पाटील, बाबूलाल बोरसे, नीळकंठ नथ्थू साळी, हिंमतराव शेनपडू शिरसाठ, भीमराव शिवदास तांबोळी, भगवान भिवसन साठे आदींच्या सहया आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com