मुले पकडण्याचा संशय; तिघांना चोप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

शहादा ः म्हसावद येथे मुले पकडणाऱ्या टोळीच्या संशयावरून आज जमावाने तिघांना चोप देत त्यांची इनोव्हा (क्रमांक एमएच 13- बीएन 7971) कारही जाळून टाकली. ही घटना आज रात्री आठच्या सुमारास घडली. हे तिघे पंढरपूरचे असून, त्यातील दोघे नगरसेवक व एक माजी नगरसेवक असल्याचे समजते. रात्री उशिरा त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी आल्याची सध्या चर्चा असून, त्यातून आतापर्यंत नवापूर, नंदुरबारला काहींना मारहाण झाली आहे. दरम्यान, आज रात्री इनोव्हा गाडीतून तीन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्याने त्यांच्यावर शंका घेत जमावाने त्यांना मारहाण केली व त्यांची गाडीही पेटवून दिली. 

घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. जमाव आटोक्‍यात येत नसल्याने शहादा येथून अधिक कुमक मागवण्यात आली तसेच एसआरपीच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा हे जवान म्हसावदमध्ये दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर तिघांना पोलिसांनी म्हसावद पोलिस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी जमलेला हजारोंचा जमाव संशयितांना ताब्यात देण्याची मागणी करत होता. या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत गावात तणाव होता. 

Web Title: marathi news nandurbar shahada child cidnap