टिक टॉकमुळे ग्रामीण भागात घरोघरी गायक! 

टिक टॉकमुळे ग्रामीण भागात घरोघरी गायक! 

शनिमांडळ : सध्या शहरासह ग्रामीण भागात युवा वर्गाला टिकटॉकने चांगलेच झपाटलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून खेड्यात गायक निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात करमणूक केंद्र नसल्याने tik.tok चा वापर मोठ्या संख्येने होताना दिसत आहे. करमणूक आणि प्रसिद्धीसाठी युवक युवती व महिला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शूट करण्यात आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे अंगात असलेल्या कलागुणांना प्रकाशात आणण्यासाठी अतिशय कमी खर्चात रॉकस्टार होण्याची संधी निर्माण झाली आहे. 


ग्रामीण भागही आजच्या काळात मागे राहिले नाही. गाण्याचा छंद सर्वांना असतो, अनेकदा एकट्याने प्रवास करताना एकांतामध्ये प्रत्येक व्यक्तीला गुणगुणायची सवय असते. त्यांना घडवण्यात आता टिक टॉक ऍप्स आधार मिळत आहे. गाण्याचे साहित्य आणि गोडीही अलीकडच्या काळात घरोघरी गायब झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी एखाद्या गाण्याचा रियाज करायचा असला तरी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागत होती, ही खर्चिक बाब असल्याने एखाद्याला आवड असूनही या क्षेत्राकडे वळणे मोठ्या अडचणीचे ठरत होते. आता टिक टॉकच्या साह्याने गाणे म्हणण्याचे वेड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये दिसत आहे. यात संगीताची गरज नसल्याने त्याचा सोपस्कार hot.tik.tok गाण्यांच्या माध्यमातून होत आहे. 
आर्थिक परिस्थिती नसतानाही गाण्याचा छंद जोपासण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये चांगले दिवस आले आहेत. मोबाईल फोनमधील ॲपचा वापर करून गाणे गुणगुणणे शक्य झाले आहे, त्यामुळे आता घरांमध्ये गायक तयार होत आहेत. यात पुन्हा विविध प्रकारचे मोबाईल ॲप्स आले आहेत, त्यामुळे मोबाईलमधील रेकॉर्डिंग स्टुडिओप्रमाणे होत आहे. स्वतः एकता येण्याची सुविधा यामध्ये आहे. हेडफोन अथवा मोबाईल अवघ्या तीनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत माईक आपल्याला रॉकस्टार बनवू शकतो. 
 
थोडीशी सावधगिरीही बाळगा 

सोशल मीडियावरील या ॲप्सचा उपयोग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात टिक टॉप आल्याने करमणुकीचे साधन बनले आहे. या ॲप्सचा करमणुकीसाठी मोठा वापर होत असला तरी तसा उपयोग करताना काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून कुठल्याही सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचीही काळजी तरुणाईकडून घेतली जावी अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com