नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना; तूर पिकाला लागली उभळी
अतिवृष्टी ने कापसाचे पीक हातचे गेल्याने अनेक शेतक-यांचे उत्पन्न हे तुर पिकावर अवलंबून होते.
कळंबू : कळंबू परीसरातील शेतक-यांचा अवकळा दिवसा गणीत वाढत आहेत.हाता तोंडाशी कांदा, मका, सोयाबीन पीकाचा शेतातच चिखल झाला.शासनाने किचकट नियमावली लावीत मदती पासुन दुरच ठेवल्याच्या तक्रारी दिल्या.परंतु काहिच परीणाम नाही झाला.आता शेतातील बहरून आलेल्या उभ्या तुर पीकाला उभळी लागल्याने अनेक शेतामध्ये खळेच्या खळे तुरीचे पिक वाळुन गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
वाचा- जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी
सारंगखेडा महसुल मंडळामध्ये कापूस पिकामध्ये अंतरपीक म्हणून तुर या द्विदल पीकाची पेरणी, लागवड जाते.यंदा अतिवृष्टी झाल्याने तुर पिक चांगलेच बहरून आले.त्यामुळे अनेक शेतक-यांची मदार ही आता तुर पिकावर होती परंतु हल्ली बहुतांश शेतक-यांच्या शेतातील बहरलेल्या तुर पिकावर उभळी हा रोग आल्याने खळेच्या खळे तुर पिक वाळुन गेले आहे.आधीच निसर्गासह कोरोना लाॅकडाऊन ने शेतकरी वर्ग हतबल झाला असतांना शेतातील पिकावरील वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा परीणाम शेतक-यांच्या मुळावर असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
तुर पिकावर शेतकरी अवलंबून
अतिवृष्टी ने कापसाचे पीक हातचे गेल्याने अनेक शेतक-यांचे उत्पन्न हे तुर पिकावर अवलंबून होते.परंतु अचानक या पिकाला उभळी लागल्याने अनेकांच्या शेतातामध्ये व खळ्यात तुर पिक जागेवरच वाळत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे