esakal | सावधान, दुचाकी सांभाळा... 
sakal

बोलून बातमी शोधा

bike robbery

दोन दिवसापूर्वी धुळ्याहून सारंगखेडा येथे दुचाकीने काकांना भेटण्यासाठी आलेल्या पुतण्या मुक्कामी राहिला अन् रात्री चोरट्यांनी डाव साधत त्याची मोटारसायकल लंपास केली. दुचाकी चोरीचा प्रकार वारंवार घडत आहे. 

सावधान, दुचाकी सांभाळा... 

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : सावधान... आपण सारंगखेडा मुक्कामी असेल तर जागते रहो करावे लागेल. येथे दुचाकी वाहन केव्हाही चोरीस जाऊ शकते. लॉकडाउन काळात परिसरातून तीस दुचाकी चोरीस गेल्या असल्याने सारंगखेडा पोलिस ठाण्यात मोटार सायकल मिळून आली का, या शोधात रोज गर्दी असते. 

हेपण वाचा- टोमॅटोला चढली लाली

सारंगखेडा व परिसरात पाहुण्यांनी मुक्कामाला राहायचे असेल, तर सावधान कारण रात्री केव्हाही मोटार सायकल चोरीस जाऊ शकते. हो हे सत्य आहे, दोन दिवसापूर्वी धुळ्याहून सारंगखेडा येथे दुचाकीने काकांना भेटण्यासाठी आलेल्या पुतण्या मुक्कामी राहिला अन् रात्री चोरट्यांनी डाव साधत त्याची मोटारसायकल लंपास केली. दुचाकी चोरीचा प्रकार वारंवार घडत आहे. 

नक्‍की पहा- आता पाच रुपयांची नोट चलनातून बंद; कोणी घेतलाय निर्णय

चोरीचे वाढले प्रमाण 
सहा महिन्याच्या लॉकडाउन काळात सारंगखेडा व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या काळात परिसरातून तीसहून अधिक मोटार सायकली चोरीस गेल्या आहेत. पोलिस ठाण्यात रोज दुचाकीस्वार मोटारसायकल मिळाली का म्हणून चौकशीसाठी येत राहतात. काल (ता. २१) परिसरात दोन दुचाकी पोलिसांना मिळून आल्यावर दुचाकी सापडली, आपली तर नाही ना. म्हणून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

माझा पुतण्या धुळ्याहून भेटण्यासाठी पल्सर मोटार सायकलने आला होता. सायंकाळी पाऊस असल्याने त्याला मुक्कामी राहण्यासाठी सांगितले. रात्री त्याची मोटारसायकल घरासमोर अंगणातून चोरट्यांनी नेली. 
-गणेश गुरव, सारंगखेडा 

संपादन ः राजेश सोनवणे