नाला खोलीकरणासाठी "जेसीबी'चे ढोल ताशाने स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बामखेडा (ता. शहादा) : एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळाले, तर कार्यकर्त्यांकडून मिरवणुक काढून जंगी स्वागत केले जाते. तसेच एखाद्या व्यक्तीने नावीन्यपूर्ण काम केल्यास त्याचीही गावातून मिरवणूक काढली जाते. परंतू बामखेडा (ता. शहादा) येथील तरुणाईने ढोल ताशाचा गजरात नाचत चक्क गावात नाला खोलीकरनासाठी आलेल्या जेसीबी मशीनची मिरवणूक काढत स्वागत केले. तसेच "आमचा पक्ष पाण्यावर लक्ष' यासारख्या घोषणा देत पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी जणू शपथच घेतली. 

पाण्याची भीषण टंचाईच्या दृष्टचक्रातून गावाला कायमचे मुक्त करण्यासाठी घामाच्या धारांनी गावकऱ्यांनी भगीरथ प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या मदतीला जेसीबी मशीनच धावून आल्याने तरुणाईचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. यावरून गाव दुष्काळमुक्तसाठी ग्रामस्थांनी वज्रमूठ बांधल्याचे दिसून आले. 
बामखेडा (ता.शहादा) येथील ग्रामस्थांनी दुष्काळापासून मुक्तीसाठी पाणी फाउंडेशनचा वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवून गाव पाणीदार करण्यासाठी जणू विडाच उचलला आहे. त्यासाठी असलेले प्रशिक्षण पूर्ण करून रोपवाटिका, शोषखड्डे, सीसीटी चर खणत ही स्पर्धा जिंकण्यासाठी ग्रामस्थ रात्र- दिवस मेहणत करीत आहे. अपेक्षित श्रमदान झाल्याने भारतीय जैन संघटनेतर्फे 250 तास मोफत जेसीबी मशिन बंधाऱ्यातील गाळ तसेच नाला खोलीकरणासाठी देण्यात आले. जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. कांतीलाल टाटीया यांनी गावाला मशिन देण्याचे जाहीर केल्यानंतर लागलीच तरुणाईने मशीनचा गाव वेशीबाहेर स्वागताची तयारी केली. यावेळी प्रत्यक्ष गावात जेसीबी मशिन आल्यावर ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.

Web Title: marathi news nandurbar water cup jcb