बांड, बांड म्हणून चिडवले...मग काय भाऊची "सटकली'...अन्‌ भिंतच तोडली ! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

मलामजी गावीत हे अमितला नेहमी आदिवासी भाषेत बांड (बांड म्हणजे चोर) असे म्हणून हिणवत असे. चाच राग मनात ठेवून अमित याने मलामजी यास बांड म्हणजे काय असतो हे दाखवून देतो, अशी खूणगाठ मनाशी बांधून मलामजीचा घरात चोरी केली. 

नंदुरबार ः "कोरोना' महामारीमूळे सर्वत्र लाऊडाऊन झाले असून कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागन होवून नये यासाठी पॅरोलवर सुट्टी दिली आहे. अशाच एका चोरीच्या गुन्हातील आरोपीला पॅरोल सुट्टीवर 
घरी आला, त्याला शेजारील व्यक्ती आदिवासी भाषेत सतत बांड..बांड (चोर..चोर) म्हणून चिडवायचा. मग काय या महाशयची सटकली अन्‌ सतत चिडवणाऱ्याचेच घर फोडून धाडसी चोरी केल्याची घटना नंदुराबर जिल्ह्यातील बालाघाट (ता. नवापुर) येथे घडली. 

क्‍लिक कराः नंदुरबार : त्या अधिकाऱ्याचे अखं कुटुंब पॉझिटिव्ह
 

बालाघाट (ता. नवापुर) येथील मलामजी मोत्या गावीत यांचे मातीकुडाचे घराची भिंत तोडून स्वयंपाक घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले 1 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपये रोख स्टीलच्या डब्यासह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 10 जूनला रात्री घडली होती. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

अन्‌ असा लागला मागोवा... 
पोलिसांनी वेगवेगळे पथके तयार करुन घरफोडीतील आरोपीची नंदुरबार व शेजारील जिल्ह्यात माहिती काढण्यासाठी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये, म्हणून राज्य सरकारने कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडलेल्या चोरीचा ह्य्‌ुातील आरोपीतांची माहिती घेतली. त्यावेळी बातमी मिळाली की, फिर्यादी मलामजी गावीत यांचे शेजारी अमितशी वाद झाला आहे. त्यामुळे त्याने ही चोरी केल्याची शक्‍यता असावी. त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध सुरू केला. 

नक्की वाचा :  नंदुरबारला विषाणू तपासणी प्रयोगशाळा 
 

अन्‌ "बांड' काय असतो हे त्याने दाखविले... 
पोलिस अमितचा शोध घेत असतांना बालाहाट गावातील सरपाटी नदी किनारी एका काटेरी झुडपाजवळ बसलेला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन अमितला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फिर्यादी मलामजी गावीत हे अमितला नेहमी आदिवासी भाषेत बांड (बांड म्हणजे चोर) असे म्हणून हिणवत असे. त्याचाच राग मनात ठेवून अमित याने मलामजी यास बांड म्हणजे काय असतो हे दाखवून देतो, अशी खूणगाठ मनाशी बांधून मलामजीचा घरात चोरी केली. 

 आर्वजून पहा : मालमत्ता कराची तिजोरी "निम्मी' रिकामी! 
 

भिंत तोडून केली चोरी... 
संतापात असलेल्या अमितने 10 जूनला रात्री मलामजी हे त्यांच्या नवीन घरी झोपण्यासाठी गेले असता अमितने मलामजी गावीत यांचे मातीकुडाचे घराच्या भिंत तोडून आत प्रवेश करुन स्वयंपाक घरात स्टीलच्या डब्यात ठेवलेले 1 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपये रोख स्टीलच्या डब्यासह चोरी केली. त्यात 1 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बालाहाट गावातील सरपाटी नदीच्या किनारी खड्डा करुन हे दागीने लपवून ठेवले. पोलिसांनी नदी किनारी जाऊन दागिने हस्तगत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Young man commits Theft,Unfold in twenty-four hours from LCB