राणे नगर भागात भर रस्त्यात पेटली नॅनो कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

इंदिरानग : राणे नगर येथे आज सकाळी साडेसातला चालत्या नॅनोने पेट घेतला. त्यामुळे एकच पळापळ झाली. श्री.सौंदाणकर नेहमीप्रमाणे राणेनगर कडून सर्व्हीस रस्त्याने त्यांच्या नॅनो कार क्रमांक एमएच 14 डीए5770 द्वारे पाथर्डीफाट्याकडे जात होते. शिवसेनेच्या नगरसेविका संगिता जाधव यांच्या संपर्क कार्यालयाजवळ अचानक त्यांच्या कारने मागच्या बाजूने पेट घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या ते लक्षात आले नाही. समोरून येणाऱ्या नागरीकांना त्यांनी ते सांगितले. तातडीने ते खाली उतरले. तोपर्यंत कारने पूर्ण पेट घेतला होता. स्थानिक नागरीक राजू कदम आणि इतरांनी पाणी टाकून कार विझवण्याचे प्रयत्न केले.

इंदिरानग : राणे नगर येथे आज सकाळी साडेसातला चालत्या नॅनोने पेट घेतला. त्यामुळे एकच पळापळ झाली. श्री.सौंदाणकर नेहमीप्रमाणे राणेनगर कडून सर्व्हीस रस्त्याने त्यांच्या नॅनो कार क्रमांक एमएच 14 डीए5770 द्वारे पाथर्डीफाट्याकडे जात होते. शिवसेनेच्या नगरसेविका संगिता जाधव यांच्या संपर्क कार्यालयाजवळ अचानक त्यांच्या कारने मागच्या बाजूने पेट घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या ते लक्षात आले नाही. समोरून येणाऱ्या नागरीकांना त्यांनी ते सांगितले. तातडीने ते खाली उतरले. तोपर्यंत कारने पूर्ण पेट घेतला होता. स्थानिक नागरीक राजू कदम आणि इतरांनी पाणी टाकून कार विझवण्याचे प्रयत्न केले. जवळ असलेल्या सिडको अग्निशामक दलाच्या जवानांनी येत आग विझवली. मात्र तोपर्यंत कारचा मागचा भाग पूर्णता खाक झाला होता. शॉर्ट सर्कीट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. 
 

Web Title: marathi news nano car burn