नंदीनी नदीत रसायनयुक्त पाणी,पालकमंत्र्यांची कबुली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदी बरोबरचं नंदीनी नदीत कारखान्यांचे रसायनयुक्त व सांडपाणी तसेच कचरा टाकला जात असल्याची कबुली पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. कारवाई म्हणून दोन कारखान्यांचे उत्पादन थांबविण्यात आले आहे. अधिवेशन संपण्यापुर्वी नदी संवर्धनासंदर्भातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या अधिकायांची बैठक बोलाविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. 

विधी मंडळाच्या अधिवेशनात आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सिमा हिरे यांनी नंदीनी (नासर्डी) नदी प्रदुषणाबाबत मुद्दा तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून उपस्थित केला. नंदिनी नदी मध्ये रासायनिक पाणी, भुमिगत गटारीचे पाणी, कचरा टाकला जात असल्याने नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये सीईटीपी प्रकल्प उभारण्याचा परवाना प्रलंबित असल्याने प्रकल्प उभा राहू शकतं नसल्याचे आमदार फरांदे व हिरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना विचारला प्रकल्पाला कधी पर्यंत परवानगी मिळेल याबाबत आश्‍वासन मागण्यात आले. प्रश्‍नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री कदम यांनी नंदिनी नदीत रासायनिक पाणी, भुमिगत गटारी तसेच कचरा टाकला जात असल्याने प्रदुषण होत असल्याची कबुली दिली.

कोणत्या कंपन्यांमार्फत रासायनिक पाणी सोडले जाते याची पाहणी केली. 32 तक्रारींच्या अनुशंगाने झालेल्या पाहणी मध्ये दोन उद्योग आढळल्याने तातडीने उत्पादन बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती श्री. कदम यांनी दिली. आमदार फरांदे यांनी अंबड औदयोगिक वसाहती मध्ये सीईटीपी प्रकल्प सुरु करण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सीईटीपी प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली. सदरचा प्रस्ताव राज्यस्तरीय तज्ञ मूल्यांकन समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला असून प्रवर्तकांकडून पूर्तता अहवाल प्राप्त न झाल्याने प्रलंबित असल्याची कबुली त्यांनी दिली.

Web Title: marathi news nasardi river problem