बागलाण अॅकॅडमीला शासनाकडून सुरक्षारक्षक परवाना प्रदान

रोशन खैरनार
गुरुवार, 15 मार्च 2018

गेल्या काही काळात खासगी कंपन्या, बँका, हॉटेल, कार्यालये येथे खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. चोऱ्या - दरोडे, लूटमार आणि हल्ले या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची गरज दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांच्या मर्यादित संख्येमुळे सर्वांना सुरक्षा पुरविणे राज्याच्या पोलीस विभागाला शक्य होत नाही. त्यामुळे खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास शासनाने परवाने दिले आहेत.

सटाणा  : येथील पोलिस, सैनिक, सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्र म्हणून गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या येथील बागलाण अॅकॅडमीला शासनाकडून नुकताच राज्यातील सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती करण्याचा परवाना देण्यात आला आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिदेशक विनयकुमार चौबे यांच्या हस्ते अकॅडमीच्या संचलिका सुनिता आनंदा महाले यांना हा परवाना प्रदान करण्यात आला.

गेल्या काही काळात खासगी कंपन्या, बँका, हॉटेल, कार्यालये येथे खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. चोऱ्या - दरोडे, लूटमार आणि हल्ले या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची गरज दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांच्या मर्यादित संख्येमुळे सर्वांना सुरक्षा पुरविणे राज्याच्या पोलीस विभागाला शक्य होत नाही. त्यामुळे खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास शासनाने परवाने दिले आहेत.

शहरातील बागलाण अॅकॅडमी ही संस्था गेल्या २० वर्षांपासून राज्यातील विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना सैनिक, पोलीस, सुरक्षारक्षक भरतीपूर्व प्रशिक्षण देत असून गोरगरीब मुलामुलींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहे. संस्थेचे शेकडो विद्यार्थी आज पोलीस व सैन्यदलात उच्चपदावर कार्यरत असून देशाची सेवा करीत आहेत. आता संस्थेला शासनाकडून सुरक्षारक्षक परवाना मिळाल्याने ओझर येथील एच.ए.एल., राज्यातील मेट्रो रेल्वे, बँका, विविध कंपन्या, मॉल, बसस्थानके, पोस्ट ऑफिस, शाळा, कॉलेज, दवाखाने, मार्केट, देवस्थान, ट्रस्ट, सबस्टेशन, हॉटेल्स अशा विविध ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या करता येतील. चैत्र महिन्यात वणी (ता.दिंडोरी) येथील महाराष्ट्रातील अर्धे शक्तीपीठ असलेल्या आई सप्तशृंगी देवीचा चैत्र पौर्णिमेला मोठा यात्रोत्सव आयोजित केला जातो. या यात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर यंदा श्री सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टतर्फे बागलाण अकॅडमीला ५० सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. इयत्ता आठवी, दहावी, बारावी, पदवीधर व १८ ते ४० वयोगटातील मुलामुलींनी कायमस्वरूपी नोकरीसाठी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन बागलाण अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आनंदा महाले यांनी केले आहे.     

Web Title: Marathi news Nashik Baglan academy