दीड किलोमीटरला एक सफाई कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक - महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असली, तरी नियोजन नसल्याने संपूर्ण व्यवस्थाच कोलमडली होती; परंतु सफाईव्यतिरिक्त टेबलांवर ठाण मांडून बसलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हातातही झाडू दिल्याने उपलब्ध झालेले व नियमित काम करणाऱ्या एक हजार ४७४ सफाई कर्मचाऱ्यांचे नियमाप्रमाणे १.३ किलोमीटरला एक याप्रमाणे समान वाटप करण्यात आले. त्यामुळे आता सिडको व सातपूर विभागावर अन्याय होत असल्याची ओरड थांबेल.

शहराच्या लोकसंख्येचा विचार करता तीन हजार ७०० सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण प्रत्यक्षात एक हजार ४७४ सफाई कर्मचारी आहेत. त्यातील ३८९ सफाई कर्मचारी झाडू मारण्याचे काम सोडून कारकुनी करीत होते. सफाई कर्मचारी भरती करण्याची मागणी अनेकदा नगरसेवकांनी केली. शासनाकडेदेखील भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रथम सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यास सुरवात केली. सर्वप्रथम नाशिक रोड, पूर्व व पश्‍चिम विभागातील अतिरिक्त कर्मचारी अन्य विभागांकडे वळविताना कारकुनी करणाऱ्या ३८९ सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात झाडू दिला. समानीकरणाचे धोरण अवलंबताना रस्त्यांच्या लांबीनुसार नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार एक हजार ९०१ किलोमीटर रस्त्यांची लांबी गृहीत धरून १.३ किलोमीटर रस्ता लांबीसाठी एक सफाई कर्मचारी दिला आहे. यापूर्वी सिडको विभागात झाडूकाम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या फक्त नव्वद होती. वास्तविक भौगोलिकदृष्ट्या मोठा विभाग असल्याने तेथे अधिक कर्मचाऱ्यांची गरज होती. पूर्व विभागात सर्वाधिक ४२२, नाशिक रोड विभागात ३३५, पंचवटी २३६, पश्‍चिम विभागात २५६, तर सातपूर विभागात १३५ कर्मचारी होते. समानीकरणाच्या नव्या नियोजनानुसार सिडको व सातपूर विभागाला अधिक कर्मचारी मिळाले आहेत.

Web Title: marathi news nashik Cleaning staff nashik municipal corporation