‘नाशिक इनोव्हेशन फेस्ट-२०१८’च्या सहभागाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

नाशिक - सामाजिक प्रश्‍न कुठलाही असो, तो सोडविण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगताना त्यासाठी भन्नाट संकल्पना शोधणाऱ्या संशोधकांना आपले संशोधन मांडण्यासाठी हक्‍काचे व्यासपीठ ‘सकाळ’तर्फे उपलब्ध होणार आहे. ‘सकाळ’च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नाशिक इनोव्हेशन फेस्ट-२०१८’ ही स्पर्धा तीन गटांत होईल. शालेय विद्यार्थ्यांसह पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच प्राध्यापकांना यात सहभागी होण्याची संधी आहे. स्पर्धेसाठी १२ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 

संशोधन समाजाच्या विकासासाठी उपयोगी ठरू शकते. या संशोधनास व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ‘सकाळ’च्या नाशिक आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त ‘नाशिक इनोव्हेशन फेस्ट-२०१८’ घेण्यात येत आहे. स्पर्धेतून समाजातील प्रत्येक घटकाला संशोधन, संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. हे ‘फेस्ट’ १५ व १६ मार्चला गंगापूर रोडवरील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल. स्पर्धेतील विजेत्यांचा १७ मार्चला होणाऱ्या ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौरव केला जाईल. 

सहभागासाठी संपर्क
विद्यार्थ्यांना आपल्या शाळा-महाविद्यालयामार्फत सहभागासाठीचे अर्ज ‘सकाळ’कडे पाठवता येतील. ‘सकाळ’च्या सातपूर येथील मुख्य कार्यालयात प्लॉट क्रमांक ३२, विकास, ‘सकाळ’ सर्कल, एमआयडीसी, सातपूर, नाशिक- ४२२००७ किंवा एफबी/१-१६, पहिला मजला, ठक्‍कर बझार, नवीन सीबीएस, नाशिक या शहर कार्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा टपालामार्फत पाठविता येतील. अर्जासोबत प्रकल्प, संकल्पनेचा सविस्तर तपशील नोंदवणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी ‘सकाळ’चे शहर कार्यालय (०२५३) २३१३३५३ किंवा सातपूर कार्यालय (०२५३) २३५००६६ या क्रमांकावर अथवा शरद धात्रक (मो. ९८९००१११२०) यांच्याशी संपर्क साधता येईल.

या गटात स्पर्धा
तीन प्रमुख गटांत ‘नाशिक इनोव्हेशन फेस्ट-२०१८’ ही स्पर्धा होत आहे. यात अभियांत्रिकीशी निगडित प्रकल्प, संकल्पनांच्या सादरीकरणासाठी एक गट असेल. वैद्यकीय, कृषीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प, संकल्पना सादरीकरणासाठी दुसरा गट, तर शाळकरी विद्यार्थ्यांपासून शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांचे प्रकल्प, संकल्पना सादरीकरणासाठी खुला गट असेल.

Web Title: marathi news Nashik Innovation Fest -2018