नाशिक-मुंबई लोकलची चाचणी तातडी करा,वामन सांगळे यांची मागणी  

residentional photo
residentional photo

नाशिक : नाशिक ते मुंबई मार्गावरील लोकल इगतपुरी-कसारा घाटातही यशस्वी होऊ शकते. परंतु यासंदर्भात चाचणी घेण्यात चालढकल केली जात आहे. मंडल रेल प्रबंधकांनी कुर्ला लोको शेडला त्यासाठी परवानगी देत लोकलची तातडीने चाचणी घेतली जावी. मात्र हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा रेल्वेतील निवृत्त अधिकारी व इगतपुरी येथे मुख्य लोको निरीक्षकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या वामन सांगळे यांनी केली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत मागणीचा विचार न झाल्यास उपोषण अथवा न्यायालयीन लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सांगळे म्हणाले, की मंडल रेल प्रबंधकांनी मार्च महिन्यात माध्यमांसमोर केलेल्या वक्‍तव्यानुसार टनेलच्या लागणाऱ्या रूंदीमुळे कसारा-इगतपुरी घाटातील प्रकल्प रद्द झाल्यात जमा आहे. परंतु त्यानंतरही मे महिन्यात आरडीएसओ, लखनौ व रेल्वे बोर्डामार्फत नऊ लाख रूपयांचा निधी कुर्ला-कारशेड येथे या लोकलची चाचणी घेण्यासंदर्भात मंजुर करत उपलब्ध करून दिला होता. तरीही चाचणी अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. दुसरीकडे निधीदेखील परत केलेला नाही. 

जुलै महिन्यात आरडीएसओ मुख्याधिकारी रणविजय यांनी लेखी पत्र देताना कल्याण-नाशिक चालणारी लोकल बिनाबॅक इंजिनची कसारा-इगतपुरी घाटात प्रवास करू शकेल, असे नमुद केले होते. तरीही काही रेल्वे अधिकारी हेतूपुरस्कर प्रकल्प अयशस्वी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जर डीआरएम यांचे वक्‍तव्य खोटे असते, तर ही लोकल रद्द व्हायला हवी होती. परंतु आजही डीआरएम यांच्या लेखी सूचनेनंतरही रेल्वे बोर्डाने ही लोकल कुर्ला कारशेडमधून हलविलेली नाही. या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यासह सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्याही ही बाब निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले. 30 डिसेंबरनंतर आपण उपोषणास बसणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

कोट्यावधींच्या नुकसानाची भिती 
25 ऑक्‍टोबर 2018 ला खासदार हेमंत गोडसे यांच्यामार्फत लोकल चाचणी करण्यासंदर्भात पत्र दिले होते. या पत्रास सिनीयर डीईई कुर्ला कारशेड यांनी चाचणी घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी आरडीएसओ यांच्या उपस्थितीची मागणी केली. या मागणीची डीआरएम, मुंबई यांच्याकडून पूर्तता न झाल्याने लोकल आजही कुर्ला 
कारशेडमध्ये अनिर्णित अवस्थेत पडून आहे. या लोकलच्या मोटरमध्ये पुराचे पाणी गेल्याची शक्‍यता असल्याने तीन लोकलगाड्यांचे मिळून सुमारे दीडशे कोटींचे नुकसान झाल्याची भिती त्यांनी व्यक्‍त केली. 

...तर कसारा घाटातही यशस्वी होऊ शकते 
कर्जत ते लोणावळा आणि कसारा-इगतपुरी या दोन्ही घाटांमधील टनेलच्या रूंदीमध्ये साम्य आहे. कर्जत-लोणावळा मार्गावर गेल्या पन्नास वर्षांपासून रिकाम्या लोकल यशस्वीपणे धावता आहेत. तर कसारा-इगतपुरीतदेखील धावण्यास कुठलाही अडथळा नसल्याचे सांगळे यांचा दावा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com