दायित्व कमी करण्याबरोबरचं नाशिककरांना "बस' भेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नाशिक : राजकीय आढेवेढे घेत सादर होणाऱ्या आज च्या अंदाजपत्रकाबद्दल नाशिककरांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकातून नाशिककरांना शहर बससेवेची भेट मिळणार असून त्यासाठी अंदाजे तीस कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त नगरसेवकांच्या विकास कामांना ब्रेक लावताना दायित्व कमी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आल्याने पुढील आर्थिक वर्षे नगरसेवकांना विकास कामांविना घालवावे लागणार आहे.

नाशिक : राजकीय आढेवेढे घेत सादर होणाऱ्या आज च्या अंदाजपत्रकाबद्दल नाशिककरांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकातून नाशिककरांना शहर बससेवेची भेट मिळणार असून त्यासाठी अंदाजे तीस कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त नगरसेवकांच्या विकास कामांना ब्रेक लावताना दायित्व कमी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आल्याने पुढील आर्थिक वर्षे नगरसेवकांना विकास कामांविना घालवावे लागणार आहे.

महापालिकेची डिजिटायजेशनकडे वाटचाल, स्मार्ट सिटी प्रकल्पातील प्रोजेक्‍ट गोदाच्या कामांना गती देण्यासाठी आर्थिक तरतुद हि महत्वाच्या विषयांना अंदाजपत्रकामध्ये चालना देण्यात आली आहे. 
प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकावरून राजकीय सुंदोपसुंदी झाल्यानंतर अखेरीस गुरुवारी (ता. 22) सकाळी अकरा वाजता प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक ठेवले जाणार आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नागरिक केंद्रीभुत मानून काम करण्याची पध्दत लक्षात घेता प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकात काय असेल याबाबत अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहिती नुसार यंदा प्रशासनाकडून दायित्व कमी करण्यावर भर देण्यात आला असून आतापर्यंत महापालिकेला प्राप्त महसुलाचा विचार न करता स्थायी समिती व महासभेकडून कोटीच्या कोटी उड्डाणे घेवून विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे दायित्वाचा भार कमी करण्यासाठी नवीन कामे टाळण्यात आली आहेत.

रस्ते कामावर आयुक्तांकडून फुली मारण्यात आली असून फारचं अत्यावशक्‍य बाब असेल तरचं रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे समजते. स्मार्ट सिटीतील प्रकल्पांसाठी निधीची तरतुद व प्रोजेक्‍ट गोदाच्या कामांना गती देण्यासाठी निधीची तरतुद केली जाणार आहे. महापालिकेच्या दस्ता ऐवजांचे डिजिटायजेशन केले जाणार असून यात विशेष करून नगररचना विभागाकडील नकाशांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. 
 
सध्याचा जमा व खर्च 
फेब्रुवारी 2018 अखेर पर्यंत महापालिकेकडे जमा उत्पन्न 1152 कोटी रुपये असून विविध योजनांवर त्यातील 1050 कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या दिड महिन्यात नगरसेवकांच्या विकास कामांना मोठ्या प्रमाणात कात्री लावण्यात आली असून त्यातून 32 कोटी रुपयांची कामे वजा झाली आहे तर 257 कोटी रुपयांच्या नवीन रस्ते विकासासाठी करण्यात आलेली तरतुद मागे घेण्यात आल्याने दिड महिन्यात दायित्वाचा भार 823 कोटी रुपयांवरून सुमारे साडे पाचशे कोटी रुपयांपर्यंत आला आहे. दायित्वाचा भार कमीत कमी करून यापुढे जेवढे उत्पन्न प्राप्त होईल तितकाचं खर्च करता येईल अशी तजवीज अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. 
 
बससेवेचे स्वप्न होणार साकार 
नाशिककरांचे बससेवेचे स्वप्न अंदाजपत्रकातून साकार होणार आहे. क्रिसिल संस्थेने यापुर्वी सत्तर कोटी रुपयांची तरतुद पहिल्या वर्षी करण्याचा सल्ला दिला होता. परंतू प्रशासनाने वास्तवता लक्षात घेवून तीस कोटी रुपयांची गुंतवणूक शहर बससेवेसाठी केली आहे त्यामुळे महापालिकेची बससेवा डिसेंबर अखेर पर्यंत रस्त्यावर दिसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
 

Web Title: marathi news nashik mahapalika bus seva