राजधानीसह इतर शहरांशी नाशिक होणार कनेक्‍ट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नाशिक : केंद्र सरकारच्या उडेगा आम आदमी (उडान) योजनेंच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली-नाशिक सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नाशिकचा संपर्क फक्त राजधानी दिल्ली शहराशी राहणार नसून देशातील चेन्नई, बेंगलुरू, कोलकाता व अहमदाबाद या महत्वाच्या शहरांशी तत्काळ साधला जाणार आहे. त्यामुळे दिल्ली-नाशिक सेवा निरंतर राहिल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे. 

नाशिक : केंद्र सरकारच्या उडेगा आम आदमी (उडान) योजनेंच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली-नाशिक सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नाशिकचा संपर्क फक्त राजधानी दिल्ली शहराशी राहणार नसून देशातील चेन्नई, बेंगलुरू, कोलकाता व अहमदाबाद या महत्वाच्या शहरांशी तत्काळ साधला जाणार आहे. त्यामुळे दिल्ली-नाशिक सेवा निरंतर राहिल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे. 

उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात एअर डेक्कन कंपनीने हवाई सेवा सुरु केली आहे. नाशिक-पुणे हवाई सेवेत परवानगीची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सध्या सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर जीव्हीके कंपनीकडून मुंईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळतं नसल्याने अनियमित स्वरुपात सेवा सुरु आहे. परंतू नाशिककरांसाठी उडान दोन योजनेंतर्गत दिल्ली-नाशिक सेवा सुरु करण्याची घोषणा झाल्याने सुखावह धक्का बसला आहे. नाशिककरांची मुळ मागणी दिल्लीसह देशातील अन्य शहरांना हवाई सेवेने जोडण्याची होती. नाशिक-मुंबई अंतर रस्ते मार्गाने सहज पार करता येते. नाशिक-पुणे अंतर राजगुरू नगरचा अडथळा सोडला तर सहज पोहोचता येते. देशातील अन्य शहरात वेगाने पोहोचण्यासाठी मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्‍ट गरजेचे होते

पंधरा जून पासून सरु होणाऱ्या जेट एअरवेज मार्फत दिल्ली-नाशिक हवाई सेवेने ती गरज भागणार आहे. दिल्लीहून दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास 168 सीटरचे विमान उड्डाण भरेल नाशिकला पोहोचल्यानंतर दोन वाजून 35 मिनिटांनी दिल्लीकडे विमानाचे ओझर विमानतळावरून उड्डाण होईल. दिल्लीला पोहोचल्यानंतर देशांतर्गत सेवेचा विचार करता महत्वाच्या शहरांना लगेचंच कनेक्‍ट विमानसेवा उपलब्ध असल्याने त्याचा फायदा व्यावसायिकांना होईल. 

सेवा निरंतर राहिल्यास? 
सध्या देशातील अन्य महत्वाच्या शहरांमध्ये तातडीने पोहोचण्यासाठी मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळाशिवाय पर्याय नाही. तेथून बुकींग न झाल्यास पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अन्य शहरांमध्ये जावे लागते. दिल्ली मध्ये रेल्वेने पोहोचण्यासाठी नाशिककर वापी मार्गाचा वापर करतात. तेथून राजधानी एक्‍सप्रेसने दिल्ली गाठता येते. दिल्ली-नाशिक सेवा निरंतर सुरु राहिल्यास मुंबई, लोहगाव व वापीचे तिन्ही खर्चिक पर्याय मागे पडून या सेवेला अधिक प्रतिसाद मिळेल. 

देशातील या शहरात वेगाने पोहोचता येणार 
- अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ, कोलकाता, चेन्नई, इंदूर, भोपाळ, अमृतसर, जयपुर, कोची, रायपूर, चंदिगढ, गुवाहाटी, नागपूर, लेह, डेहराडून. 

आंतरराष्ट्रीय शहरांशी थेट कनेक्‍ट 
- लंडन, मस्कत, बॅंकाक, दुबई, दोहा, मस्कत, दम्माम. 
 

Web Title: marathi news nashik new delhi to other city