नाशिक - बागलाण तालुक्यात दहावीच्या परीक्षेस सुरळीत सुरुवात

रोशन खैरनार
गुरुवार, 1 मार्च 2018

सटाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज गुरुवार (ता. 1) पासून बागलाण तालुक्यातील १२ परीक्षा केंद्रांवर शांततेत व सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षेसाठी तालुक्यातून ५११५ विद्यार्थी प्रविष्ठ झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक साहेबराव बच्छाव व पी.आर.जाधव यांनी दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळातर्फे सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्हीची नजर असून दक्षता समित्यांचीही नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विद्यार्थ्यांना साखर व गुलाब देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आज मराठी विषयाचा पहिलाच पेपर असल्याने सकाळी १० वाजेपासूनच सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी व पालकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेदहा वाजता परीक्षार्थींची कसून तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात येत होते. येथील लोकनेते पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या परीक्षा केंद्रावर सटाणा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष भारत खैरनार, केंद्र संचालक बी.एस.देवरे, किशोर ह्याळीज, दत्तू बैताडे, एस.टी. सोनवणे, दादाजी खैरनार, दादू सोनवणे, विनायक बच्छाव, आर.जे.थोरात, रामकृष्ण अहिरे आदींच्या हस्ते सर्व परीक्षार्थींना साखर व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. 

परीक्षेसाठी तालुक्यात सटाणा व जायखेडा या दोन ठिकाणी स्वतंत्र कस्टडी असून सटाणा अंतर्गत व्हीपीएन विद्यालय, लोकनेते पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा, कपालेश्वर विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल डांगसौंदाणे, पी.डी. विद्यालय लखमापूर व हरणबारी तर जायखेडा कस्टडी अंतर्गत मुल्हेर, ताहाराबाद, नामपूर, आसखेडा व जायखेडा अशी एकूण १२ परीक्षा केंद्र आहेत. सटाणा येथे गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव तर जायखेडा येथे विस्तार अधिकारी पी.आर.जाधव हे परीरक्षक म्हणून काम बघत आहेत.

दरम्यान, परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी सटाणा शहरासह तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली.
 
Web Title: Marathi news nashik news 10th exam baglan taluka