तब्बल दोन वर्षानंतर महापालिका शाळेत विजेच्या दिव्यांचा लखलखाट

राजेंद्र बच्छाव
शुक्रवार, 9 मार्च 2018

इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी येथील मळे भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या वाडीचेरान येथील महापालीका शाळा क्रमांक १०१ ला नगरसेविका संगिता जाधव यांनी महिलादिना निमीत्त काल (ता.८) हक्काच्या वीज मीटरची भेट दिल्याने येथे लखलखाट तर झालाच शिवाय येथे असणाऱ्या बोअरवेल साठी असलेला पंप देखील सुरू झाल्याने येथे १ ली ७ वीच्या शिकणाऱ्या सुमारे १७१ विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न देखील निकाली निघाला आहे. 

तत्कालीन मनसे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी ही दुमजली आकर्षक इमारत बांधून घेतली होती. राज ठाकरे यांनी देखील येथे असलेल्या सोयीसुविधांमुळे या इमारतीचे जाहीर कौतुक केले होते. त्यामुळे जून २०१६ ला शाळेच्या पहिल्या दिवशी तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते इमारतीचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला होता. मात्र वीजेची सोय नसल्याने शाळा सुरू झाली मात्र वर्गात लाईट बंद,पंखे बंद, प्रोजेक्टर बंद अशी स्थिती होती.

वीजेच्या मीटरसाठी प्रयत्न सुरू झाले मात्र यश आले नाही. दरम्यान मुख्याध्यापिका जयश्री घोलप यांनी त्यांचे बंधू कै.विजय दीघे यांच्या स्मरणार्थ काही चित्रे रंगवून घेतली. येथील शिक्षक रामदास बच्छाव, अशोक देवरे, रत्नाकर गवारी, योगेश वायशिंदे, संगिता बोराडे यांनी स्वखर्चाने वर्गांची सजावट करून घेतली. पालकांनी देखील यासाठी स्वखुशीने वर्गणी दिली. मात्र वीज नसल्याने सर्वच फीके फीके होते.

गतवर्षी जाधव शिवसेने तर्फे निवडून आल्या त्यांनी येथे पाण्याची गरज आोळखून बोअरवेल करून दीली.मात्र वीज नसल्याने याचा काही उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आले.दुसरे नगरसेवक भगवान दोंदे यांनी त्यांच्या निधीतून उर्वरीत वर्गांमध्ये लाईटफीटींग करून दिली. गरज लक्षात घेत जाधव यांनी वीजमीटर साठी पाठपुरावा सुरू केला. काही महीन्यांच्या प्रयत्नांनंतर सर्व सोपस्कार पार पाडत काल महिलादिनाची भेट म्हणून येथे वीज मीटर बसवले आणि शाळेला ह्ककाची वीज मिळवून दिली. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी जाधव यांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक अमोल जाधव देखील उपस्थित होते. 

या शाळेत मुख्यता शेतकरी आणि शेतमजुरांची मुले शिकतात. वीज नसल्याने शाळेची आकर्षक इमारत खऱ्या अर्थाने निरुपयोगी होती. हक्काचे वीज मीटर आल्याने आपोआप येथील पाणी प्रश्न देखील निकाली निघाला आहे. शाळेत कमी असलेले एक शिक्षक येथे आणत ही संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे माझे स्वप्न आहे, असे मत नगरसेविका गीता जाधव यांनी व्यक्त केले. 

Web Title: Marathi news nashik news after 2 years electricity to school