क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

नाशिक : सिडकोतील लेखानगर येथील एका लॉटरीच्या दुकानात भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची खबर मिळताच पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. सुमारे 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सदरची कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली. याप्रकरणी राजश्री लॉटरी सेंटरचा मालक दत्तू पंढरीनाथ आव्हाड (38, रा. गजानन चौक, अंबड), अनिल सुभाष कदम (29, रा. शिवाजी चौक, मॉडर्न शाळेच्या पाठीमागे, सिडको), हर्षल कारभारी सानप (28, रा. खंडेराव चौक, शांतीनगर, सिडको) या तिघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना लेखानगर येथील लॉटरी दुकानामध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची खबर मिळाली होती. सदरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्यानंतर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लेखानगर येथील राजश्री लॉटरी सेंटरवर गुरुवारी (ता. 1) रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी लॉटरी दुकानाचा मालक दत्तू आव्हाड याच्यासह अनिल कदम, हर्षल सानप हे तिघे संशयित भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असताना आढळून आले. 

छाप्यात पोलिसांनी मोबाईल, एलसीडी टीव्ही, रोकड असा 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, विजय लोंढे, हवालदार रमेश घडवजे, संजय ताजणे, देवकिसन गायकर, मोतीलाल महाजन, जयंत शिंदे, ललिता आहेर, राजेद्र जाधव, श्रीराम सपकाळ, राजाराम वाघ, परमेश्‍वर दराडे, अन्सार सय्यद, नितीन भालेराव, यादव डंबाळे यांच्या पथकाने बजावली.

Web Title: Marathi news nashik news bating cricket arrest