सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी - गिरीश महाजन

दिपक निकम
गुरुवार, 15 जून 2017

चांदवड (जि. नाशिक) - सरकार शेतकरी हितासाठी सदैव तत्पर असून शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून कर्जमाफीतील निकषांसंदर्भात सर्वांशी विचारविनिमय करून अल्पभूधारक, बागायतदार यांच्याबाबत निकष ठरवून निर्णय घेतला जाईल. यासाठी साधारणत: 5 ते 7 दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड येथे केले.

तालुक्‍यात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसामध्ये एक महिला वीज पडून मूत्यूमुखी पडली होती. तसेच गाय, बैल असे जनावरेही दगावली होती. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदतीचे धनादेश आज (गुरुवार) पंचायत समिती सभागृहात पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आ. डॉ. राहुल आहेर, जि. प. सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, कृषी अधिकारी विजय पवार, गट विकास अधिकारी पुष्पा पांडे आदी उपस्थित होते

सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी - गिरीश महाजन
चांदवड तालुक्‍यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारून शेतमालाला हमीभाव देता यावा, यासाठी "पतंजली'चे योगगुरू रामदेवबाबा यांचा शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग तालुक्‍यात उभारण्यात यावा अशी मागणी आहेर यांनी महाजन यांच्याकडे केली आहे. या कामासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची कबुली महाजन यांनी दिल्याने चांदवडकरांच्या आशा उंचावल्या आहेत.

Web Title: marathi news nashik news chandwad news girish mahajan