'मतदार दिवस' रॅली काढून नांदगावमध्ये जागृती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

महसूल विभाग व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार दिवसानिमित्त जागृती अभियान प्रसंगी देवगुणे बोलत होते.

नांदगाव : भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदार जागृतीसाठी नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत देवगुणे यांनी केले.

महसूल विभाग व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार दिवसानिमित्त जागृती अभियान प्रसंगी देवगुणे बोलत होते. तालुक्यासह नांदगाव विधानसभा मतदार संघातील अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी येथील तहसील कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या मतदार कक्षात अठरा वर्षीय नवमतदारानी नावे नोंदवावीत असे आवाहनही देवगुणे यांनी केले. 

मतदार दिनानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे मतदार नोंदणीचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी मतदार नोंदणीबाबत महत्वाची माहिती उपप्राचार्य प्रा.संजय मराठे यांनी दिली. तर नवमतदारांना मताचे पावित्र्य राखण्याची विद्यार्थी व नवमतदारांना व उपस्थितांना शपथ देण्यात आली. या पत्राचे वाचन प्रा.मापारी यांनी केले. तालुक्यात निवडणूक साक्षरता कक्ष सुरू केला असून, या कक्षाच्या माध्यमातून निवडणूक विषयक व नवमतदार नोंदणीविषयक जागृती केली जाणार आहे.

प्राचार्य डॉ.एस. आय. पटेल, उपप्राचार्य प्रा.संजय मराठे, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.आर.टी.देवरे, प्रा.सी.ई.गुरूळे, प्रा.संदिप दौंड, प्रा.पगारे, प्रा.सुदाम राठोड, प्रा. सी. बी. निगळे, प्रा. एस. एम. नारायणे, सतिष पुणतांबेकर, प्रा.ए.के.जाधव, प्रा.दिलीप पाटील, प्रा.आर. एल. दिवटे, प्रा.वाकचौरे, प्रा.गावले, प्रा.एन.एम.गावीत, प्रा.एस.एस.वळवी, प्रा.डी.ई.उकिर्डे, प्रा.सी.ई.गुरूळे, प्रा. प्रतिभा जाधव यांनी आणि या तालुक्यातील निवडणूक शाखेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी रॅलीचे नियोजन केले. या रॅलीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

Web Title: Marathi news Nashik news election day rally nandagaon