दहावी, बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळतात - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

नाशिक : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी काम नाही म्हणून नाक्‍यावर जाऊ लागतात. नाक्‍यावरील मुलांसोबत टवाळक्‍या करायला लागतात. काही महिन्यांत सिगारेट व बिअर प्यायला लागतात व त्यासाठी पैसे मिळावे म्हणून चेनस्नॅचर्सचे इनफॉर्मर (माहितगार) बनतात. नंतर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, असे वादग्रस्त विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. ही बाब मुंबईचे पोलिस आयुक्‍त राकेश मारीया यांनी आपल्याला सांगितल्याचा दाखला त्यांनी दिला. 

महिरावणी येथील संदीप फाऊंडेशन येथे आयोजित शिक्षणाची वारी उपक्रमात मार्गदर्शनासाठी तावडे नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा ऑक्‍टोबर ऐवजी लवकर घेऊन विद्यार्थ्यांचे वर्षच नव्हे तर आयुष्य वाचविल्याची प्रतिक्रीया पोलिस आयुक्‍त मारीया यांनी दिली होती, असे सांगताना अनुत्तीर्ण मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे वादग्रस्त विधान केले. 
तेराशे शाळा बंद करण्याच्या वादग्रस्त निर्णयाविषयी ते म्हणाले, की ज्या शाळांची पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करत त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे, असा हेतू होता. शाळा बंद केलेल्या नसून केवळ शाळांतील वास्तूचा वापर बंद करत तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये दाखल केले आहे. मात्र यासंदर्भात गैरसमज पसरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Marathi news nashik news failed students crime