बागलाणच्या पश्चिम पट्यात वणव्यामुळे होतोय पर्यावरणाचा ऱ्हास 

रोशन भामरे 
शुक्रवार, 16 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्यचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे.

तळवाडे दिगर (नाशिक) : जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्यचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे.

उन्हाळा सुरु झाला आणि पावसाळा जवळ आला की, या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लागतात पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लगली की, शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. त्यामुळे वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

अनेकदा रात्रीच्या वेळी असा प्रकार केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव-जंतू होरपळून मरण पावतात. सध्या बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगर, भवाडे, मोरकुरे, पठावे परिसरातील खलप, भिलाई, वाटा, रोह्या, उंबरमाळ आदी डोंगरदऱ्यांत हे वणवे मोठ्या प्रमाणात पेटू लागले आहेत. परिणामी एकवी हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता मात्र काळे ठिक्कर दिसू लागले आहेत.

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मोठ्या प्रमाणत डोंगर असून बरेच आदीवासी गाव, वाड्या वस्त्या डोंगरावर तसेच पायथ्याशी असल्यामुळे या वणव्याचा धोका काही वाड्या वस्त्यानेबसण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. काही विकृत माणसे रस्त्याने जाता येताना डोंगरदऱ्यांतून गवताला आगी लावण्याचे काम करतात. या परिसरात कोणाचीही देखरेख नसल्यामुळे अशा वृत्ती फोफावत आहेत. एकदा आग लागली कि ती अनेक दिवस धुमसत राहते. त्यामुळे पशु-पक्षी सैरावैरा धावायला लागतात. अनेक सुक्ष्म जीव होरपळून जातात. पण हि आग कोण लागत काय लावत याची जबाबदारी कोणीच करत नाही; मात्र त्यावर ठोस उपयोजना केली जात नाही.आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यापेक्षा ती लावली जावू नये यासाठी प्रबोधन करण्याची तसेच सम्बन्धितावर कडक करवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Marathi news nashik news fire at forest birds animals dies environment affects