तिसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

नाशिक : अशोका मार्गावरील जेएमसीटी महाविद्यालयामागे असलेल्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पडून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची करुण घटना घडली. हसनेन मोईन सय्यद असे चिमुकल्याचे नाव असून सय्यद दाम्पत्याचा तो नवसाचा मुलगा होता. या घटनेमुळे खोडेमळा परिसरात शोककळा पसरली. 

हसनेन मोईन सय्यद (4, रा. फ्लॅट नंबर 10, जेएमसीटी कॉलेजमागे, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक) असे दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद कुटूंबिय हे जेएमसीटी महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. हसनेन हा काल (ता. 30) सायंकाळी सात-साडेसात वाजेच्या सुमारास राहत्या घरामध्ये बहिणीसोबत खेळत होता. खेळता-खेळताच तो घराच्या गॅलरीमध्ये आला असता, त्यावेळी त्याचा गॅलरीच्या कठड्यावरून तोल गेला आणि खाली पडला. या घटनेमध्ये त्याच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्यास तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉ. ज्ञानेश्‍वर रकिबे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. मेनरोडवर मोबाईल दुरुस्तीचे दुकान असलेले मोईन सय्यद यांचा हसनेन हा एकुलता एक नवसाचा मुलगा होता तर त्यास एक मोठी व एक लहान बहीण आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Marathi news nashik news girl fall down from 3rd floor