गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात गृहप्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक - शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या रविवार (ता. 18)च्या गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या प्रारंभदिनी शहरात अनेकांनी गृहप्रवेशाचा मुहूर्त साधला. नव्याने उभारलेला बंगला वा फ्लॅटमध्ये धार्मिक पूजाविधी उरकून नव्या घरात प्रवेश केला. त्याचप्रमाणे, अनेकांनी आपल्या नवीन घरांचे स्वप्न साकारण्यासाठीही या शुभमुहूर्ताची निवड करीत, बांधकाम व्यावसायिकांकडे स्वप्नातील घर निश्‍चित केले. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. 

गुढीपाडव्याचा मुहूर्त काही मोजक्‍या मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आजच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन वास्तू खरेदी वा गृहप्रवेश केला. अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांना भेटी देत आपल्या स्वप्नातील घरांची निवड केली. पूर्णत्वास गेलेल्या इमारतीतील फ्लॅटमध्ये अनेकांनी आजच्या शुभमुहूर्ताची निवड करीत गृहप्रवेशही करून घेतला. त्यामुळे अनेक ठिकाणी आज पुरोहितांकडून धार्मिक पूजाविधी सुरू होता, तर त्यानंतर नातलगांची लगबगही पाहावयास मिळाली. 

कोट्यवधींची उलाढाल 
दरम्यान, आजच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी आपल्या नवीन घरासाठीची बुकिंग केले आहे. या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या नामांकित बांधकाम प्रोजेक्‍टसह बांधकाम व्यावसायिकांकडे ग्राहकांची रीघ होती. कार्यालयांमध्ये आगाऊ अनामत रक्कम भरून आपल्या स्वप्नातील घरांचे बुकिंग केले. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. त्याचप्रमाणे व्यावसायिक दालनांसंदर्भातील आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात झाले आहेत, तर काही व्यावसायिक दालने, कार्यालयांचे उद्‌घाटन सोहळेही मुहूर्तावर सुरू होते.

Web Title: marathi news nashik news gudi padwa