बिबट्याला ठार करून अवशेष गायब करणाऱ्या एकास अटक

विजय पगारे
रविवार, 11 मार्च 2018

तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा चांगल्या प्रमाणात वास्तव्य आहे. शेणीत ता. इगतपुरी येथील शेतकरी संदीप मोरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 404 मध्ये वन्यप्राणी 5 ते 6 महिन्याची मादीचा आढळला.

इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील शेणीत येथे एका बिबट्याच्या मादीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी पथक रवाना झाले. तेथील पाहणी करताना वन विभागाला मृत बिबट्याच्या मादीच्या शरीराचे अवशेष नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा नक्की घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आले. तसेच आता बिबट्याच्या अवयवांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वन विभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपासाची चक्र फिरवताच अवघ्या तीन ते चार तासांत आरोपीला मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश आले. यातील आरोपीला चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे 

तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा चांगल्या प्रमाणात वास्तव्य आहे. शेणीत ता. इगतपुरी येथील शेतकरी संदीप मोरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 404 मध्ये वन्यप्राणी 5 ते 6 महिन्याची मादीचा आढळला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर पी ढोमसे, जी आर जाधव, एफ जे सैय्यद, एस के बोडके, आर टी पाठक व बी व्ही दिवे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तेथील बिबट्या मृतदेहाची पाहणी करताना मादी बिबट्याच्या शरीराचे अवशेष नसल्याचे निदर्शनास आले. 

याबाबत वन विभागाच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानुसार कारभारी बाबुराव पवार (रा कोल्ही ता वैजापुर जि औरंगाबाद) याच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत केला. वनविभागाच्या पथकाने आरोपी भारतीय वन अधिनियम 1972 नुसार अटक केेली. त्याला आज न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी दिली. याबाबत सहाय्यक वनसंरक्षक रोहयो वन्यजीव संरक्षण शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र आधिकारी आर पी ढोमसे व आदी कर्मचारी तपास करीत आहेत 

Web Title: Marathi News Nashik News Igatpuri News Leopard One Arrested