उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गावठी दारू व रसायन नष्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

खामखेडा (नाशिक) : उमराणा (ता. देवळा) गावाच्या शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने हातभट्टीची दारू बनविणाऱ्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले. या छाप्यात 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आला. तीन महिन्यापूर्वी चिंचवे (ता. देवळा) येथील कार्यवाही नंतर ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली.

उमराणा गाव व परिसरातील आदिवासी वस्तींवर मोठ्या प्रमाणावर गावठी दारू पाडली जात असून गाव व परिसरात खुलेआम विक्री करण्यात येते. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कार्यवाही करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्काच्या कळवण व सटाणा येथील भरारी पथकाच्या माहितीनुसार छापा टाकत या ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू व तयार असलेले 3000 लिटर रसायन व दारू बनवण्याचे साहित्य, ड्रम्स व हातभट्ट्या वर कारवाई करत नष्ट केल्या

या कार्यवाहीत 1 लाख 90 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल, 100 लिटर क्षमतेचे एकूण 72 ड्रम, 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम तसेच हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आदींचा समावेश आहे.

 या कारवाई दरम्यान कळवण विभागाचे निरीक्षक आय. एन. वाघ, विलास बामणे, दुय्यम निरीक्षक प्रकाश आहिरराव, सटाणा विभागाचे जयराम जाखेरे, योगेश सावखेडकर, योगेश माळी, एम.डी.गरुड, राजेश धनवटे, अवधूत पाटील, महेंद्र बोरसे, आण्णा बहिरम, संतोष कडलग, पांडुरंग वाईकर, विलास पावरा, प्रवीण बागडे, गणेश शेवगे, विट्ठल हाके, अमित गांगुर्डे, कैलास कसबे यांनी या कार्यवाहीत भाग घेत मोठी कार्यवाही केली.

उमराणा जवळील चिंचवे परिसरात देखील दोन महिन्यात अशीच मोठी कार्यवाही विभागाने केली होती. चिंचव्यातील कार्यवाहीनंतर उमराना परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवून देवळा तालुक्यात व चांदवड या भागात वितरित होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास होती. या भागात दारू बनवणारे रॅकेट उमराण्यात कार्यरत असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याने ही कारवाई करण्यात आली. देवळा तालुक्यातील पूर्व भागात हातभट्टीची दारू बनवून महामार्गालगत व्यावसायिकांना पुरवणारे रॅकेट या परिसरात कार्यरत असल्याने ते पूर्णपणे उध्वस्त केल्याने परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे या मोहिमेने दणाणले आहे.

Web Title: Marathi news nashik news illegal liquor