नाशिक: कोलंबिका देवस्थानच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा

Land scam
Land scam

नाशिक छ त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका जमीन गैरव्यवहार प्रकरणी विश्‍वस्त प्रभाकर शंकर महाजन बांधकाम व्यवसायीक सचिन दिनकर दप्तरी यांच्यासह तत्कालीन तहसिलदार तलाठी मंडल आधिकाऱ्यांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहे. सकाळ ने 23 फेब्रूवारीला सर्वप्रथम हा प्रकार उजेडात आणला होता.

त्र्यंबकेश्‍वर शिवारातील कोलंबिका देवस्थान व गंगाद्वारे ट्रस्ट्रचे गट क्रमांक 301, 321, 327, 328, 358, 323,325, 326, 322 (1) 322, (2), 324, 300 या सुमारे 175 एकर जमीनी देवस्थान इनामी जमीन असून त्या हस्तांतरीत करण्यासाठी शासन आणि धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता हस्तांतरीत करुन कुळ बदलले गेले. तसेच गाव फेरफार नोंद क्रमांक 1356 नुसार तत्कालीन तलाठी बी.एम.हांडोरे, व तत्कालीन मंडल आधिकारी एन.एम.बिरारी यांनी कुळ बदलला मंजूरी दिली.

त्यानंतर जमीनीचा अकृषक वापर सुरु असतांनाही कुळ कायदा कलम 32 (अ) नुसार तत्कालीन तहसिलदारा रामसिंग सुलाने आणि रविंद्र भारदे यांना आधिकार नसतांनाही
त्यांनी बांधकाम व्यवसायीक सचिन दिनकर दप्तरी यांचे सात बारा उताऱ्यांवर कुळ म्हणून नाव लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन तलाठी बी. एम.हांडोरे, मंडल आधिकारी एन.एम.बिरारी तहसिलदार रामसिंग सुलाने, रविंद्र भारदे यांच्यासह तत्कालीन तलाठी व मंडल आधिकाऱ्यां विरोधात देवस्थानच्या इनामी जमीनी शासन आणि धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी विनाच गिळकृंत करण्याच्या प्रकारात फसवणूक केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री साडे अकराला गुन्हा दाखल झाला आहे. नायब तहसिलदार एस.एम.निरगुडे यांच्या फिर्यादीवरुन त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

नदी उगम स्थानांवरच घाला
त्र्यंबकेश्‍वर हे देशातील पुरातन तिर्थस्थळ आहे तसेच हे क्षेत्र भारताच्या पच्छिम इको झोन आणि राखीव वन क्षेत्राचा परिसर आहे. त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्‍यातील
ब्रम्हगिरीसह विविध डोंगर दऱ्यातून वैतरणा, गोदावरी, दमनगंगेसह विविध नद्यांचे उगमस्थान म्हणून या दोन्ही तालुक्‍याचे भौगोलिक व पर्यावरणीय अंगाने प्रचंड महत्व आहे. दोन्ही तालुक्‍यातील धरणातून मुंबईसह मराठवाड्यापर्यतच्या तेरा जिल्ह्याना म्हणजे साधारण 40 टक्के महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे उगमस्थान आहे. मात्र काही वर्षात बिल्डर्स व भूमाफियांनी देवस्थानच्या कूळावर नाव असलेल्यांच्या मदतीने देवस्थानच्या जमीनीचे कुळ बदलासह त्या जमीनी गिळकृंत करीत, नद्यांचे उगमस्थान असलेले डोंगरच्या डोंगर भुईसपाट करण्याचा सपाटा चालविला आहे. एका बाजूला पुरेशा सिंचनाअभावी राज्यात शेतकरी आत्महत्यां वाढत असतांना सिंचनाचे स्त्रोत असलेल्या नद्याच जिवंतपणी मारण्याच्या या उद्योगांविरोधात प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच आहे. अशा पार्श्‍वभूमीवर कोलंबिका प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याना पर्यावरणीय अंगाने महत्व आहे.

सगळ्याच चौकशा व्हाव्या
कोलंबिका गैरप्रकाराच्या निमित्ताने त्र्यंबकेश्‍वरमधील विविध देवस्थानच्या कूुळ बदलांसह जमीन गैरव्यवहाराचे अनेक प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. इतरही काही देवस्थान विश्‍वस्तांच्या आज बैठका होउन त्यांच्याकडून चौकशांच्या मागण्या सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे येत्या काळात पाठपुरावा सुरु होणार आहे. कोलंबिका प्रकरणात मुंबईतील आमदार तृप्ती सावंत यांनी विधानसभेत याविषयी चर्चा घडविण्याची मागणी केली असल्याने एकुणच महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांच्या डोंगर संवर्धनाचा मुद्दा विधानसभेपुढे चर्चेला येण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com