बिबट्याची दुचाकीस्वारावर झेप, हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

Sanjeev-Kumavat
Sanjeev-Kumavat

इंदिरानगर (नाशिक) : काल (ता. 5) रात्री नऊच्या सुमारास पिंपळगावखांब फाट्यावर दुचाकीवर झेप घेत दुचाकी स्वाराला बिबट्याने जखमी केले. नशीब बलवत्तर आणि हेल्मेट परीधान केल्याने त्यांची या हल्ल्यातून सुटका झाली असून दुचाकी पडल्याने घाबरलेला बिबट्या देखील माघारी पळाला असला तरी त्याला देखील दुखापत झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

दरम्यान अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरीकांत भीती पसरली आहे. काल रात्री सातपूर येथील आयुर्वेदाचे चिकीत्सक संजीव कुमावत (वय 52) दुचाकी क्रमांक एम. एच. 02 सी.यु. 4771 द्वारे कामानिमीत्त नाशिकरोकडे चालले होतो. त्यांच्यामागे चारचाकीने सातपूरचे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळा निगळ जात होतो. पिंपळगावफाट्याच्या जवळ उजव्या बाजूला असलेल्या नर्सरी जवळ कुमावत आले असता नर्सरी मधून देान उड्यात बिबट्या रस्त्यावर आला आणि तिसरी उडी त्याने थेट कुमावत यांच्यावर घेतली. त्यामुळे ते खाली पडले. निगळ यांनी देखील गाडी थांबवली. यात बिबट्या देखील भेलकांडला आणि चारचाकीच्या प्रखर दीव्यांना घाबरून पुन्हा त्याने नर्सरीकडे पलायन केले. कुमावत यांना तर काहीच कळले नाही. मानेला आणि खांद्याला मात्र मुका मार लागला. झेप मात्र थेट तोंडावर होती, मात्र हेल्मेटमुळे त्यांच्यावरचे संकट टळले. 

दरम्यान आसपासचे नागरीक देखील येथे जमा झाले. कुमावत यांना प्रथमोपचार करून पुढे पाठवण्यात आले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून रात्री कुत्र्यांचे भूंकणे वाढले असून बिबट्याचा वावर असला की असे हेाते असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. येथील रहीवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहीती दिली असून पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे. 

अचानक मोठे धुड चेहऱ्यावर पडले. त्यामुळे प्रचंड घाबरलो. काही कळण्याच्या आत खाली पडलो मात्र पडताना त्या प्राण्याच्या अंगावरच्या चमकदार ठीपक्यांना स्पष्ट बघितले. त्यामुळे तो हमखास बिबट्या होता. फक्त हेल्मेटमुळे माझा जीव वाचला. रात्रीच्या वेळी येथून जाताना सावधानता पाळणे महत्वाचे आहे, अशी भावना संजीव कुमावत यांनी व्यक्त केली. कुमावत यांच्या अगदी वीस फुट मागे मी गाडी चालवत होतो. त्यामुळे स्पष्ट पणे मी बिबट्या बघितला. त्याने कुमावत यांच्यावर झेप घेतली. ते पडले त्यात दुचाकीचा आवाज आणि माझ्या चारचाकीच्या दीव्यांमुळे तो भांबावला आणि आल्या दिशेने पुन्हा पसार झालास असे बाळा निगळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com